आर्वीत प्रथमच घडली एवढीमोठी घटना अवघ्या एका तासात १२ दुकानांवर चोरट्यांनी केला हात साफ पोलीसांचा नाकर्तेपणा आला पुढे, व्यापाऱ्यांनी केला संताप व्यक्त तातडीने तपास करा माजी आमदार दादाराव केचे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या सुचना
तातडीने तपास करा पोलीस ड्युटी लावा माजी आमदार दादाराव केचे , अशी माहिती पडली घटना, पोलीसांनी सिसिटीव्ही फुटेज केले हस्तगत, दोन मोपड गाड्याचा वापर तर पाच ते सहा लोकांनी केला कारनामा, गांज्या व सट्टेवाल्याचा हा प्रताप

आर्वी,दि.९:- अवघ्या दिड तासात चोरट्यांनी १२ दुकांनांचे शेटर वर करुन गल्यातील पैशावर हात साफ केला. रात्री दिड वाजे पासुन तर अडीच वाजताचे दरम्यान हि घटना घडली असावी असा अंदाज वर्तवील्या जात आहे. यामुळे पोलीसांचा नाकर्तेपणा पुढे आला आहे. तर, माजी आमदार दादाराव केचे यांना याची माहिती होताच ते तात्काळ घटनास्थळी पोहचले. व त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने तपास लावण्याच्या सुचना भ्रमणध्वनीवरुन दिल्या. रवीवारी (ता.नऊ) रात्री हि घटना घडली.
शहरातील मुख्य बाजारापेठ म्हणुन गणल्या गेलेल्या नेताजी मार्केट मधील टावरी किराणा दुकान, लक्ष्मी किराणा दुकान, लक्ष्मी जनरल स्टोअर, ताजदार किराणा दुकान, राजु किराणा स्टोअर, जयश्री किराणा स्टोअर, क्रीष्णा किराणा भंडार, क्रीष्णा किराणा स्टोअर, प्रकाश आत्मारामजी गुल्हाणे, संजय ट्रेडर्स, जेठानंद गोकुलदास लालवाणी, हरिओम किराणा स्टोअर्स, आदि ट्रेडर्स या दुकांनांना चोरट्यांनी लक्ष केले असुन यातील किराणा मालाला त्यांनी हात लावला नाही मात्र गल्ला फोडून आतील रोकड, सोन्याचे ऐवज, मौल्यवान वस्तु आदिंवर हात साफ केला आहे. यात कोणाचे किती नुकसान झाले याचा पोलीस तपसीलवार तपास करीत आहे.
हि बाजार पेठ रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहते. एक वाजेनंतर चोरट्यांनी फक्त किराणा दुकांनाना आपले लक्ष करीत चार पाच चोरट्यांनी एका एका दुकानाचे शटर हाताने तोडून तिन ते चार फुटा पर्यंत वर केले आत मध्ये शिरले आणी त्यांनी आतील गल्यालाच आपले लक्ष केले. गल्यातील रोकड व मौल्यवान वस्तुवर हात साफ करुन अवध्या काही मीनीटातच दुसऱ्या दुकानाला आपले लक्ष केले. असे अवध्या चार तासात त्यांनी १२ दुकानावर हात साफ केला. वृत्त लिही पर्यंत कोणाचे किती नुकसान झाले आहे हे कळु शकले नाही. ठाणेदार डेहणकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करीत आहे.
तातडीने तपास करा पोलीस ड्युटी लावा
माजी आमदार दादाराव केचे
माजी आमदार दादाराव केचे यांना माहिती होताच ते तातडीने घटनास्थळी पोहचले त्यांनी प्रत्येक दुकाना जवळ जावुन व्यापाऱ्यांसोबत संवाद साधला संपुर्ण माहिती घेतली आणी उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव यांच्या सोबत मोबाईल वरुन संपर्क साधुन झालेल्या घटनेबद्दल नापसंती व्यक्ती केली आणी तातडीने तपास करुन चोरट्यांना जेरबंद करण्याच्या सुचना दिल्या तसेच दररोज रात्रीच्या पोलीसांच्या ड्युट्या लावण्याच्या कडक सुचना दिल्या .
अशी माहिती पडली घटना
नेहरु मार्केट मधील हॉटेल व्यवसायीक नितीन जयसींगपुरे हा भल्या पहाटे पाच वाजता दुकान उघडण्याकरीता मार्केट मधे आला तेव्हा त्याला वधवा यांच्या दुकानाचे शटर तुटल्याचे दिसुन आले त्याने याची माहिती भ्रमणध्वनीवरुन त्याला दिली. जसजसा तो आपल्या दुकानाकडे जात होता तस तसा त्याला प्रत्येक किराणा दुकानाचे शटर तुटल्याचे दिसुन आले त्यांनी दिलेल्या माहिती वरुन दुकानदार मार्केट मध्ये पोहचले.
पोलीसांनी सिसिटीव्ही फुटेज केले हस्तगत
यातील काही दुकानात सिसिटीव्ही फुटेज लावलेले आहे. पोलीसांनी ते हस्तगत केले असुन त्यात चार ते पाच लोक हातानेच दुकानाचा शटर वर करुन आत शिरत असतांना आणी आती गल्ला तोडतांना दिसत आहे उजेडाकरीता मोबाईल टॉर्चचा वापर केला आहे तर एका दुकानात त्यांनी जास्तीचा वेळ दौडलेला नाही. आपली ओळख लपवीण्याकरीता त्यांनी तोडांवर दुप्पटा बांधलेला आहे. पोलीस निरीक्षक खेमसींग कोहचाडे, दिगांबर रुईकर, योगेश चन्ने निलेश करडे, अमर हजारे, डिबी पथक आदि ठाणेदार डेहणकर यांच्या मार्गदर्शनात प्राथमीक तपास करीत आहे.
दोन मोपड गाड्याचा वापर तर पाच ते सहा लोकांनी केला कारनामा
सिसीटीव्हीच्या माध्यमातुन चोरट्यांनी याकरीता दोन पांढऱ्यारंगाच्या मोपड गाड्यांचा वापर केला असुन पाच ते सहा लोकांनी अवघ्या एक ते अडीच तासात हा कारणानाम केल्याचे प्राथमीक दर्शनी दिसुन येत आहे.
व्यापाऱ्यांचा पोलीसांवर रोष, गस्तवाले काय करत होते असा सवाल,
गांज्या व सट्टेवाल्याचा हा प्रताप
शहरातील व्यापाऱ्यांचा पोलीसांवर चांगलाच रोष आहे. रात्री ११ वाजता आम्ही दुकान बंद करुन घरी गेलो त्यानंतर आमच्या दुकानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीसांची आहे. त्याकरीता गस्ती पथक सुध्दा पोलीस लावतात हे गस्ती पथक काय करत होते असा सवाल करत शहरात मोठ्या प्रमाणात गांज्या व सट्ट्याचे प्रकार वाढले आहे त्यातीलच कुणाचा तरी हा प्रताप असावा असा संशय व्यक्त करुन या प्रकरणाचा तातडीने तपास करण्यात यावा अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान, लालवाणी, प्रकाश गुल्हाणे, अज्जु अन्सारी, धनपत टावरी, रवी ठाकुर, हरुमल ठाकुर, शेख मोहसीन शेख युनूस, अविनाश कोटवाणी, नरहरी बागवाले, प्रमोद अग्रवाल, संजय माखीजा, जेठानंद लालवाणी, अनिल वधवा आदिंनी करुन निषेधार्थ व्यापारपेठ बंद ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.