Uncategorizedआरोग्य विषयक

पाण्याचा प्रश्न सुटला, लवकरच स्मार्ट स्वच्छता गृह पडणार नागरिकांच्या उपयोगी

माजी नगरसेवक प्रकाश गुल्हाणे व अज्जु अन्सारी यांचे प्रयत्न झाले सफल

     आर्वी,दि.८:- २० लाख रुपये खर्च करुन निर्माण केलेला स्मार्ट स्वच्छतागृह गत चार महिण्यापासुन पाण्याची सोय नसल्याने बंद पडला होता. मात्र नेहरु मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दिलेल्या सम्मतीने पाण्याचा प्रश्न चुटकीसरसी सुटला आणी स्मार्ट स्वच्छता गृह लवकरच लोकोपयोगी येणार असल्याचे नगर पालीकेचे पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी सुरेंद्र चोचमकर यांनी सांगीतले.

हाच तो स्मार्ट स्वच्छतागृह

   नगर परिषदेने इंदिरा मार्केट मध्ये आधुनीक पध्दतीचा स्मार्ट स्वच्छता गृह निमार्ण केला होता. मात्र पाणी कुठून घ्यावा हा त्यांच्यापुढे यक्ष प्रश्न उभा राहीला. बाजार परिसरात स्वच्छता गृह नसल्याने ग्रामीण भागा मधून येणाऱ्या महिला व पुरुष ग्राहकांसह नेहरु मार्केटमधील व्यापाऱ्यांना अडचण होत होती. माजी नगरसेवक प्रकाश गुल्हाणे व अज्जु अन्सारी यांनी हि अडचण दुर करण्याचा चंग बांधला. धान्य बाजारात असलेल्या नगर पालिकेच्या बोरींग मधुन पाण्याचा पुरवठा होवु शकते आणी आपणा सर्वांची सोय होवु शकते हे मार्केट मधील व्यापाऱ्यांना त्यांनी पटवुन दिले. शुक्रवारी (ता.सात) नगर परिषदेचे पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी सुरेंद्र चोचमकर यांना व्यापाऱ्यांनी निवेदन दिले. त्यांनी सर्व  पाहाणी केली आणी लगेच पाईप लाईन टाकुन पाणी घेण्याचे मान्य केले. तसे कर्मचारी व कामगारांना सुध्दा निर्देश दिले. अवध्या चार पाच दिवसात इंदिरा मार्केट मधील स्मार्ट स्वच्छता गृह पैसे द्या आणी वापरा या तत्वावर लोकोपयोगी पडणार आहे.

निवेदन देण्याऱ्यांमध्ये माजी नगरसेवक प्रकाश गुल्हाणे, अज्जु अन्सारी, प्रकाश लालवाणी, देवीदास डाफे, सतीश गुल्हाणे, विजय डवरे, राजेश गुप्ता, गगण शर्मा, राजेश अमृतकर, अशोक नाकतोडे, रमेश पाचघरे, रियाज पठाण, किशोर काळे, शेख हय्युम आदिंचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button