MaharashtraUncategorizedनिकृष्ठ बांधकाम

शहराच्या मधातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची होणार दुर्गती आधीच धिमी गती, त्यात ही निकृष्ट दर्जाच काम, अधिकाऱ्यांच दुर्लक्ष

मुरूमाऐवजी गोट्याचा थराचे आछांदन करुन होत आहे रस्त्याचे काम, वरवर डांबराचा थर काढुन चार, पाच इंच मुरूमाटी गोटे टाकुन दबाई, आमदार, खासदारांनी लक्ष देण्याची गरज आहे, रस्त्याच्या देखभालीची जबाबदार चार वर्षाची त्यानंतर काय?,

मुरूमाऐवजी गोट्याचा थराचे आछांदन करुन होत आहे रस्त्याचे काम

      आर्वी दि.७:- तळेगाव (शा.पं.) पासुन सुरू झालेल्या शहराच्या मधातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होवुन तब्बल आठव वर्ष पुर्ण झाले मात्र रस्ता पुर्ण झालेला नाही यातच कामाचा दर्जा अत्यंत निकष्ट्र दर्जाचा असल्याने बनल्यानंतर त्याची लवकरच दुर्गती होण्याची शक्यता आहे. याची कल्पना अधिकाऱ्यांना असतांना सुध्दा ते दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

केंद्रीय रोड ट्रॉन्सपोर्ट आणी हायवे मंत्रालयाच्या माध्यमातून तळेगाव (शा.पं) ते आर्वी पर्यंतच्या १४ किलोमीटर रस्त्याचे काम हाती घेतले आहे. याचे बांधकाम एप्रील २०१७ पासुन सुरू झाले. मात्र तब्बल आठ वर्ष पुर्ण होवुन सुध्दा पुर्णत्वास गेले नाही. तत्कालीन आमदार दादाराव केचे यांनी कार्यालयाला कुलूप लावण्याचा संकल्प केला होता तर, खासदार अमर काळे यांनी होम हवन सुध्दा केले मात्र केंद्रीय बांधकाम विभागाचे डोळे उघडले नाही. म्हणायला वैशिष्ट कपंनी व पी. एम. अग्रवाल यांच्याकडून काम काढून घेण्यात आले आणी आता सामाजीक व राजकीय कार्यकर्ते दिपक मडावी यांच्या कांचन इन्फ्रा कन्स्ट्रकश्न कंपनीला काम दिले. मात्र हि कंपनी उपकार केल्याच्या भावनेतून काम करीत आहे शिवाय केंद्रीय बांधकाम विभागाचे अधीकारी सुध्दा राजकीय दबावात असल्याने निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम सुध्दा खपवुन घेत आहे.

वरवर डांबराचा थर काढुन चार, पाच इंच मुरूमाटी गोटे टाकुन दबाई

      हा मार्ग पुर्वीचा डांबरीकरणाचा आहे. यावरील डांबराचा कोट काढून त्या खालील खोदाई करुन त्यात चांगल्या दर्जाचा मुरुम भरायचा आहे. मात्र कंत्राटदार फक्त वरचा तिन इंचाचा डांबराचा कोट काढत असुन फक्त तिन ते पाच इंचाच मुरूम नाही तर, मुरमाटी गोट्याचा थर आंथरुन त्यावरच मातीयुक्त गिट्टीचा थर टाकत आहे. सिमेंटीकरणानंतर दबाई सुध्दा हलक्या मशीनने केल्या जात आहे. परिणामी हा रस्ता जास्तीजास्त चार ते पाच वर्ष चांगल्या अवस्थेत राहील आणी त्यानंतर रस्त्याला भेगा पडणे सुरू होईल असे जाणकाराचे मत आहे. याची माहिती कार्यकारी अभियंता जगताप, उपविभागीय अभियंता उमर इनामदार यांना आहे. मात्र कंत्राटदाराला राजकीय पाठबळ असल्यामुळे ते सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र यामुळे याकरीता लागत असलेल्या शासनाच्या निधीचा दुरोपयोग तर होत आहे शिवाय चार ते पाच वर्षा नंतर नागरिकांना पुन्हा खड्डेयुक्त मार्गावरुच प्रवास करावा लागणार असल्याची शक्यता असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.

आमदार, खासदारांनी लक्ष देण्याची गरज आहे

     राजकीय नेता कंत्राटदार असल्यामुळे दबावात येत असलेले अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे परिणामी निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत आहे. हे बांधकाम मजबुत टिकावु व दर्जेदार व्हावे असे जर वाटत असेल आणी शासनाच्या निधीचा योग्य प्रकारे उपयोग व्हावा असे जर वाटत असेल तर आमदार व खासदारांनी यात लक्ष घालने गरजेचे आहे अशी नागरिकांची मागणी आहे.

वर्धा मार्गाला पडले खड्डे अशी होणार अवस्था

रस्त्याच्या देखभालीची जबाबदार चार वर्षाची त्यानंतर काय?

     कंत्राटदारावर या मार्गाच्या देखभालाची जबाबदारी फक्त चार वर्षाचीच आहे. चार वर्ष या रस्त्याला काहीच होणार नाही मात्र त्यानंतर ज्या प्रमाणे वर्धा मार्गावर खडे पडले आहे, जागोजागी गिट्टी सुध्दा निघाली आहे तशीच गत या  मार्गाची होण्याची शक्यता आहे त्यावेळी नागरिकांना अनेक यातन सहन करत खड्यांमधुन प्रवास करावे लागेल त्याचे काय? असा प्रश्न नागरिकांचा आहे.

चार वर्षा नंतर दुरस्तीचा टेंडर काढू

उपविभागीय अभियंता उमर इनामदार  

हा मार्ग एनएचडिपी अंतर्गत होत असल्यामुळे कंत्राटदार बांधकामाचे साहित्य कुठन आणतो आणी कुठे नेवून टाकतो हे पाहणे आमचे काम नाही. त्यांनी त्याच्या मर्जीने बांधकाम साहित्य आणायचे असते आणी ते वापरायचे असते. किती खोदकाम करायचे हे तोच ठरवीतो. बांधकामाची मोजमाप पुस्तकी सुध्दा कंत्राटदारच तयार करतो. कंत्राटदाराने जमा केलेला मुरूम तो आणुन टाकत आहे अशा शब्दात उपविभागीय अभियंता उमर इनामदार यांनी कंत्राटदाराची पाठ राखन केली आहे. शिवाय चार वर्षा नंतर दुरस्तीकरीता पुन्हा नवीन टेंडर काढण्यात येईल अशी माहिती दिली.

रस्त्यावर टाकण्याकरीता कंत्राटदारान आणलेली दगड माती

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button