सामाजीक

स्वच्छता गृह त्वरीत सुरू करुन नागरिकांची अडचण दुर करा

आर्वी शहर सुधार समीतीची मागणी

आर्वी,दि.५:- शहराच्या आठवडी बाजारातील स्मार्ट स्वच्छता गृह व नेताजी सुभाष चंद्रबोस पुतळ्या लगतचे जुने स्वच्छता गृह त्वरीत सुरू करुन नागरिकांच्या अडचणी दुर करा अशी मागणी आर्वी शहर सुधार समितीची असुन त्यांनी बुधवारी (ता.पाच) नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांना निवेदन दिले आहे.

हेच ते निरोपयोगी स्मार्ट स्वच्छता गृह

  इंदिरा मार्केट मध्ये बाजाराकरीता येणाऱ्या नागरिकांची व त्या परिसरातील व्यवसायीकांच्या सोयी करीता गत चार महिण्यापुर्वी नगर परिषदेने हजारो रुपये खर्च करुन आधुनीक पध्दतीचे स्मॉर्ट स्वच्छता गृह निर्माण  केले मात्र याला लागणाऱ्या पाण्याची सोय केली नाही. परिणामी ते निरोपयोगी ठरत असल्याने नागरिकांची व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. महिलांना अनेक अडचणीला समोर जावे लागत आहे.

तर दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्या लगत सुमारे २५ वर्षा पुर्वी पासुन स्वच्छता गृह बांधुन पडले आहे. याचे अजुन पर्यंत उद्घाटन सुध्दा झाले नाही . आज पर्यंत एकाही व्यक्तीला याचा उपयोग झाला नाही. मात्र नगर परिषदेच्या मुक संम्मतीने काही व्यक्ती गोदम म्हणुन याचा वापर करीत आहे.

     

घाणीचे साम्राज्य आणी आपला कार्यक्रम उरकतांना नागरी‍क

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरा भारत स्वच्छ भारतचा नारा देतात मात्र दुसरीकडे नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरण्यास मदत होत आहे. हि फार खेद जनक व लज्जास्पद गोष्ट असुन याकडे नगर परिषदेने त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे. दोन्ही ठिकाणचे स्वच्छता गृह सर्व सुवीधेसह नागरिकांच्या सोयी करीता उपलब्ध करुनु देण्यात यावे अशी मागणी आर्वी शहर सुधार समीतीची आहे.

निवेदन देणाऱ्यांमध्ये मनोज आगरकर, सतीश शिरभाते, इश्वर नागपुरे, मंगेश इंगळे, रवी तळेकर, अतुल जयसिंगपरे, अभीजीत भिवगडे, इमरान पठाण, पवन पडोळे, कुंदन चकोले, सतीश गुल्हाणे, संजय चिंधेकर, देवीदास डाफे, निनावे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button