Maharashtraसत्कार

“सत्तेचा खेळ भारतातील ४८ नियमांचे मार्गदर्शन” या पुस्तकाचे लेखक हर्षल भुसारी यांचा सर्वस्तरांवरुन होत आहे सत्कार तर, आमदार सुमीत वानखेडे यांनी पुनश्च पुस्तकाचे केले विमोचन

हि उपलब्धी फार कमी लोकांना मिळत, अशी मिळाली पुस्तक लिहीण्याची प्रेरणा, सत्ता कशी कार्य करते याकरीता मार्गदर्शक

लेखक हर्षल भुसारी यांचा सत्कार करतांना

आर्वी,दि.५:- पुणे येथुन प्रकाशित झालेल्या “सत्तेचा खेळ भारतातील ४८ नियमांचे मार्गदर्शन” (NAVIGATING 48 LAWS IN INDIA) या पुस्तकाचे लेखक प्रा. हर्षल दिनेश भुसारी यांचा सर्वस्तरावरुन सत्कार केल्या जात असुन आमदार सुमीत वानखेडे यांनी त्यांच्या या पुस्तकाचे पुनश्च विमोचन करुन त्यांचा सन्मान केला आहे.

पुस्तक लेखकांची नगरी म्हणुन गणल्यागेलेल्या पुणे शहरात येथील प्रा. हर्षल भुसारी यांनी लिहीलेल्या “सत्तेचा खेळ भारतातील ४८ नियमांचे मार्गदर्शन” (NAVIGATING 48 LAWS IN INDIA) पुस्तकाचे प्रकाशन होणे म्हणजे आर्वी शहराला मिळालेला मोठा सन्मान आहे आणी म्हणुन, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव तर होतच आहे. शिवाय सर्व स्तरावरुन सत्कार सुध्दा केल्या जात आहे.

संताजी महाराज संघटनेच्यावतीने येथील माहेश्वरी भवनात नुकत्याच घेण्यात आलेल्या सत्कार सोहळा कार्यक्रमात आमदार सुमीत वानखेडे यांनी हर्षल भुसारी यांच्या पुस्तकाचे पुनश्च विमाचन केले. तर सोमवारी (ता.तिन) मनोज आगरकर, सतीश शिरभाते, संजय चिंदेकर, विनोद अजमिरे, रवी गोडबोले, मनोज गोडबोले, अश्विन शिरभाते, संदीप लोखंडे, अतुल जयसिंगपुरे, पवन ढोले, अभिजीत भिवगडे, निखिल भिवगडे, कुंदन चकोले, दर्शन हांडे आदिंनी त्यांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तु देवुन सहपरिवार सत्कार केला. याशिवाय अनेक संघटनांनी सुध्दा सत्कार करुन त्यांचे कौतुक केले.

लेखक हर्षल भुसारी यांचा पुस्तकाचे विमोचन करतांना मान्यवर

हि उपलब्धी फार कमी लोकांना मिळते

     पुणे येथील ज्या एम आय टी स्कुल ऑफ गर्व्हमेंट महाविध्यालयात मी शिकलो आणी राजकारणात यशस्वी झालो त्याच कॉलेज मध्ये शिकता शिकता हजारो लोकांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या प्रा. हर्षल भुसारी यांच्या पुस्तकाचे पुण्यातुन प्रकाशीत होण हि माझ्यासाठी अभिमानाची बाबा आहे तर त्यांच्या करीता फार मोठी उपलब्धी आहे. अशी संधी फार कमी लोकांना मिळते अशा शब्दा आमदार सुमीत वानखेडे यांनी लेखक हर्षल भुसारी यांच्या “सत्तेचा खेळ भारतातील ४८ नियमांचे मार्गदर्शन” या पुस्तकाचे विमोचन करतांना त्यांचे कौतुक केले.

अशी मिळाली पुस्तक लिहीण्याची प्रेरणा

     पुणे येथील एम आय टी स्कुल ऑफ गर्व्हमेंट या महाविध्यालयात शिक्षण घेणारा हर्षल भुसारी हा त्याच महाविध्यालयात प्राध्यापक म्हणुन नौकरी करुन लागला. त्यांला पुस्तक वाचनाचा छंद होता. राज्यशासन व अंतरराष्ट्रीय संबंध रिसर्च असोशीएटेड या विषयाचा अभ्यास करतांना प्रसिध्द लेखक रॉबर्ट ग्रीन यांचे द ४८ लॉज ऑफ पॉवर हे पुस्तक वाचनात आले. यात भारतीय इतिहास आणि राजकारणाच्या संदर्भात भारतीय उदाहरणाचा अभाव असल्याचे लक्षात आले त्यामुळे त्याने अनेक प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. आणी यातुन मिळालेल्या माहितीच्या आधारावर  कोरोना काळात प्रेरणा घेऊन पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली.

सत्ता कशी कार्य करते याकरीता मार्गदर्शक

       यात प्राचीन काळापासून आजच्या भारतीय राजकारणापर्यंत सत्तेचे विविध पैलू  कसे लागू झाले आहेत याचे सखोल, रचनात्मक, विविध तत्त्वाच्या सुसंग्राह्य बाबीचा  समावेश  स्पष्ट केलेला आहे. कौटिल्य यांचे अर्थशास्त्र, महाभारत आदि ग्रंथामधून प्रेरणा घेत चाणक्य इंद्रगुप्त मौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महानुभावांनी सत्ता कशी मिळवली वाढवली आणि टिकवली हे या पुस्तकात सविस्तर मांडले असून राजकारणात यशस्वी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार  यासारख्या समकालीन नेत्यांचे उदाहरणासह विविध ग्रंथांमधून सखोल संशोधन करून त्या माहितीच्या आधारे लिहिलेले हे पुस्तक भारतीय राजकीय संदर्भात सत्ता कशी कार्य करते हे समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे अशी माहिती पुस्तकाचे लेखक हर्षल भुसारी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button