समाजसेवक अविनाश टाके यांचा आजी, माजी आमदारांनी केला सत्कार

आर्वी,दि.४:- शैक्षणीक सामाजीक, सांस्कृतीक, राजकीय, वृत्तपत्र क्षेत्रात मोलाची कामगीरी करणारे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी समाजसेवक अविनाश टाके यांचा विधानसभेचे आजी आमदार सुमीत वानखेडे व माजी आमदार दादाराव केचे यांनी भावपुर्ण सत्कार करुन सन्मान केला. संताजी महाराज संघटनेच्यावतीने येथील माहेश्वरी भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुल्हाणे हे होते. तर, आमदार सुमीत वानखेडे, माजी आमदार दादाराव केचे, माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, माजी नगरसेवक प्रकाश् गुल्हाणे आदि प्रमुख अतिथी होते.
समाजात, सर्वाना मदत करण्याची प्रवृती जपणारे काही व्यक्ती असतात, आपल्याला हे जिवन सत्कर्म करण्याकरीता मिळाले असुन त्याची जपवणुक केल्या गेली पाहिजे हि आंतरीक भावना जोपसण्याच धेय्य मनी बाळगणारे व्यक्ती थोडे थोडकेच असतात त्यातील एक म्हणजे अविनाश टाके हे आहेत. ते सातत्याने पत्रकारांपासुन तर समाजातील प्रत्येक घटकाला मदत करतात त्यांच्या याच गुणाचा आदर करीत समाजाच्यावतीने शाल, श्रीफळ व सन्मान पत्र देवुन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात असुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या बद्दल संघटनेचे संस्थापक अनिल बजाईत प्रा. राजेश सोळंके, संपादक विजय अजमीरे, रवींद्र कोटंबकार, हर्षल काळे, दशरथ जाधव, संजय पाटणी, सुर्यप्रकाश् भट्टड, परवेझ साबीर, अरुण कहारे, प्रा. सुरेन्द्र गोठाणे, भरत जैसिंगपुरे, पवन शिरभाते, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर आसोले, माजी नगरसेवक प्रकाश गुल्हाणे, प्रविण बिजवे, सतिश शिरभाते, प्रमोद गाठे प्रविण शेलोकार, विशु आगलावे, पंकज साकोरे, मनोज गुल्हाणे, मनोज टाके, गणेश देऊळकर, विक्की कहारे, लक्ष्मण बोरवार, मंगेश कोल्हे, रवी गोहत्रे, आत्माराम पाटील, मनोज सवाई, बाळासाहेब गुजरकर, योगेश त्रिवेदी, अनुप जैसिंगपुरे, रमण दलाल, रवींद्र दलाल, योगेश पाटील, किशोर हिंगलासपुरे, संदिप लोखंडे, अरुण जैसिंगपुरे, सुनील टाके, संजय अग्रवाल, अशोक देऊळकर, संदीप अग्रवाल, उत्तम यावलेकर, राजु नखाते, गोपाल कदम, अशोक धुर्वे, अतुल जिरापुरे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहेत.
दु:खद निधन
आर्वी,दि.४:- सामाजीक कार्यकर्ते, सिध्दार्थ सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक सदस्य तथा सेवानिवृत्त शिक्षक श्रीकृष्ण मनवर (८५ वर्ष) यांचे मंगळवारी (ता.चार) दु:खद निधन झाले.
त्यांच्या मागे मुलगा, सुन, नातुनातवंडासह मोठा आपत्तपरविार आहे. त्यांच्या या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात दु:खद वातावरण निर्माण झाले आहे.