प्रकरण, कदम यांची मालमत्ता जबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न ॲड. दिपक मोटवाणी यांच्या अटकपुर्व जामीनीवर होणार गुरूवारी (ता.सहा) निर्णय आरोपी आठ दिवस झाले तरी पोलीसांना गवसला नाही
पोलीसांच्या तावडीतुन आरोपींनी केले पलायन, जामीनी करीता गुरूवार (ता.सहा) पर्यंत पहावी लागणार वाट, सहा पोलीस पथक घेत आहे शोध, मात्र आरोपी गवसला नाही

ह्याच जागेचा जबरन घेत होते ताबा
आर्वी,दि.३:- कदम यांची मालमत्ता जबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी असलेल्या ॲड. दिपक मोटवाणी व करण मोटवाणी यांनी अटक पुर्व जामीन मिळवीण्याकरीता वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे त्यावर गुरूवारी (ता.सहा) निर्णय होणार असल्याने तुर्तास तरी आरोपीला दिलासा मिळाला नाही. तर दुसरीकडे तब्बल आठ दिवसाच्या प्रयत्नात पोलीसांना आरोपी गवसला नसल्याने चर्चेला उधान आले आहे.
बस स्थानका लगतच्या वंसत नगर मधील अजय कदम यांचे प्लॉट क्रमांक चार वरील घर नागपुर येथील बँक आफ इंडिया कडे गहाण होते. हा घर नागपुर येथील राकेश खत्री याने २२ डिसेंबर २०२३ ला झालेल्या लिलावात विकत घेतला याची गुरूवारी (ता.२३) खरेदी करण्यात आली व शुक्रवारी (ता.२४) ताबा सुध्दा घेतला. दुसरे दिवशी या व्यवहारासोबत काही संबंध नसतांना अँड. दिपक मोटवाणी हे चार पाच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेवुन अजय कदम यांच्याकडे गेले आणी लिलावविक्रीत नसलेल्या घराला जबरीने कुलूप लावुन कब्जा करीत होते. या प्रकरणी अजय कदम आदिंनी केलेल्या तक्रारीवरून ॲड. दिपक मोटवाणी व त्यांच्या साथीदारांवर विविध कलमान्वये रवीवारी (ता.२६) गुन्हा दाखल झाला मात्र पोलीसांनी त्यांना अटक केले नाही.
येथुनच केले आरोपींनी पलायन
पोलीसांच्या तावडीतुन आरोपींनी केले पलायन
प्रकरण नागपुरचे पोलीस महासंचालक दिलीप पाटील भुजबळ यांच्या पर्यंत पोहचले सोमवारी (ता.२७) ते भंडाऱ्यांचा दौरा रद्द करुन तातडीने आर्वीला आले. तत्पुर्वी वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन व सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर कवडे यांनी सकाळी १० वाजे पासुनच चौकशीला सुरूवात केली. चौकशी दरम्यान त्यांनी वादातीत असलेल्या मालमत्तेची नगर परिषद अधीकारी, भु-सव्हेक्षण अधिकारी, पटवारी आदिंन पासुन सर्व माहिती गोळा केली रात्री ९ वाजता पर्यंत तपास चालला आरोपीला अटक करण्याचे आदेश दिली मात्र तत्पुर्वी ॲड. दिपक मोटवाणी व करण मोटवाणी यांनी पोलीसांच्या हातावर तुरी देवुन पलायन केले आणी अटक पुर्व जामीन मिळवीण्याकरीता शुक्रवारी (ता.२८) वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात वकीला मार्फत अर्ज दाखल केला.
जामीनी करीता गुरूवार (ता.सहा) पर्यंत पहावी लागणार वाट
दिपक मोटवाणी व करण मोटवाणी यांचा अटक पुर्व जामीन अर्ज वर्धा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश सयैद अमीर सैयद मोहम्मद अली यांच्या बेंच पुढे आली. त्यांनी पोलीसांचे म्हणने बोलावीले. त्यावर सोमवारी (ता.तिन) शासनाच्यावतीने सरकारी वकील गिरीश तकवाले यांनी बाजु मांडली तर, आरोपीच्यावतने ॲड. बि पी वैध्य यांनी आपले म्हणने मांडले. तुर्तास तरी त्यांचे म्हणने न्यायाधिशांनी एैकुण घेतले असुन गुरवारी (ता.सहा) आदेशा करीता ठेवली आहे. तो पर्यत आरोपींना अटक पुर्व जामीनी करीता वाट पाहावे लागणार आहे.
सहा पोलीस पथक घेत आहे शोध, मात्र आरोपी गवसला नाही
रवीवारी (ता.२६) गुन्हा दाखल झाला. तेव्हा पासुन आरोपी पोलीसांच्या डोळ्यासमोर होता मात्र त्यांना अटक केली नाही. नागपुरचे पोलीस महानिरीक्षक, वर्धा पोलीस अधिक्षक, सहाय्यक पोलीस अधिक्षक यांनी सुध्दा त्यांची सोमवारी (ता.२७) विचारपुस केली मात्र अटक करण्याची दक्षता घेतली नाही. तो पर्यंत आरोपींनी उपविभागीय कार्यालयातुन पलायन केले. तेव्हा पासुन सहा पोलीस पथक अहोरात्र फिरून त्यांचा शोध घेत आहे मात्र आज पर्यंत पोलीसांना तो गवसला नाही. याबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.