Uncategorizedपोलीस कारवाई

कदम मालमत्ता प्रकरणात ठाणेदार यशवंत सोलसे यांची तडकाफडकी बदली आरोपी ॲड. दिपक मोटवाणीचे पोलीसांच्या तवडीतुन पलायन, दोन पोलीस कर्मचारी होणार निलंबीत

पोलीस निरीक्षक सतिश डेहणकर यांनी घेतला पदभार, व्यापाऱ्यांची धमकी ठरला फुसका बार , ॲड. दिपक मोटवाणी यांची तक्रार खोटी

या मालमत्तेचा झाला लिलाव

आर्वी,दि.२८:- येथील बॅक आफ इंडियाच्या नागपुर शाखेने लिलाव केलेल्या जागे शिवाय अजय कदम यांच्या मालकीच्या जागेवर जबरन कब्जा करण्याप्रकरणी तक्रार दाखल करुन न घेणाऱ्या ठाणेदार यशवंत सोलसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असुन सतिश डेहणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर, स्टेशन डायरीवर असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असुन ॲड. दिपक मोटवाणी व इतर आरोपींनी पोलीसांच्या तावडीतून पलायन केले आहे.

लिलावात नसलेल्या या मालमत्तेचा कब्जा घेण्याचा प्रयत्न

बस स्थानका लगतच्या वंसत नगर मधील अजय कदम यांचे प्लॉट क्रमांक चार वरील घर नागपुर येथील बँक आफ इंडिया कडे गहाण होते. हा घर नागपुर येथील राकेश खत्री याने २२ डिसेंबर २०२३ ला झालेल्या लिलावात विकत घेतला याची गुरूवारी (ता.२३) खरेदी करण्यात आली व शुक्रवारी (ता.२४) ताबा सुध्दा घेतला. दुसरे दिवशी या व्यवहारासोबत काही संबंध नसतांना अँड. दिपक मोटवाणी हे चार पाच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेवुन अजय कदम यांच्याकडे गेले आणी लिलावविक्रीत नसलेल्या घराला जबरीने कुलूप लावुन कब्जा करीत होते. त्याला त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तुला काय करायचे आहे ते कर पोलीसात जा माझ काहीच होत नाही हि सगळी मालमत्ता माझीच आहे असा दम दिला. सोबतच्या गुंड प्रवृतीच्या लोकांनी सध्दा यात सहभाग घेतला. अजय कदम यांच्या डोळ्यादेखत त्यांनी लिलावात विक्री न झालेल्या जागेला सुध्दा गुंड प्रवृतीच्या व्यक्तींच्या सहकार्याने कुलूप लावले.

अशी झाली तक्रार दाखल

याची तक्रार करण्याकरीता अजय कदम हे त्याच वेळी शनिवारी (ता.२५) पोलीस ठाण्यात पोहचले मात्र पोलीसांनी त्यांची तक्रार घेतली नाही . दुसरे दिवशी रवीवारी (ता.२६) सगळे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी झेंडावंदन कार्यक्रमात असतांना ॲड. दिपक मोटवाणी हे जबरन कब्जा घेण्याकरीता पुन्हा अजय कदम यांच्या घरी गेले व त्यांनी अजय कदम यांच्यासह त्यांची पत्नी, सुन व इतरांना मारहान केली. या प्रकरणी सुध्दा अजय कदम हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले मात्र पोलीसांनी त्यांना बसवुन ठेवले कदम यांनी आमदार सुमीत वानखेडे यांच्या सोबत संपर्क साधला त्यांनी पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल करण्यात आली मात्र आरोपी डोळ्यासमोर असतांना सुध्दा अटक केली नाही.

पोलीसांच्या तावडीतुन आरोपींनी केले पलायन

प्रकरण पोलीस महासंचालकापर्यंत पोहचले सोमवारी (ता.२७) भंडाऱ्यांचा दौरा रद्द करुन तातडीने ते आर्वीला आले. तत्पुर्वी वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन व सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर कवडे यांनी सकाळी १० वाजे पासुनच चौकशीला सुरूवात केली. चौकशी दरम्यान वादातीत असलेल्या मालमत्तेची संपुर्ण माहिती गोळा केली. नगर परिषद अधीकारी, भु-सव्हेक्षण अधिकारी, पटवारी आदिंन पासुन सर्व माहिती गोळा केली तो पर्यंत नागपुरचे पोलीस महासंचालक दिलीप पाटील भुजबळ हे सुध्दा पाच वाजताचे सुमारास पोहचले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली तर आरोपी व फिर्यादीला सुध्दा विचार पुस केली. तपास रात्री ९ वाजता पर्यंत चालला आणी आरोपीला अटक करण्याचे आदेश दिली मात्र तत्पुर्वी विकील असलेल्या ॲड. दिपक मोटवाणी यांना अंदाज आला आणी येथील उपविभागीय कार्यालयाच्या परिसरातुन पोलीस महानिरीक्षकांसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत आपल्या साथीदारासह पलायन केले.

ठाणेदार यशवंत सोलसे यांची बदली तर दोनवर निलंबनाची कारवाई

     पोलीस ठाण्यात तक्रार घेवुन येणाऱ्याची तक्रार घेणे हे पोलीसांचे आध्य कर्तव्य असुन त्यानंतर तपास करुन गुन्हा नोंद करणे आवश्यक आहे. त्या दिवसाचे पोलीस डायरी अधिकारी गजानन मरस्कोल्हे होते तर, स्टेशन डायरी अमंलदार सतिश नंदागवळी हे होते यांनी ठाणेदार यशवंत सोलसे यांच्या आदेशाशिवाय तक्रार घेण्यास नकार दिला त्यांनी अजय कदम यांना बसवुन ठेवले. परिणामी आमदार सुमीत वानखेडे यांनी पोलीस स्टेशन गाठले तेव्हा त्यांची तक्रार दाखल करण्यात आली. याची सुध्दा पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ यांनी माहिती घेतली आणी ठाणेदार यशवंत सोलसे यांची तडकाफडकी बदली केली तर, सतिश नंदागवळी व गजानन मरस्कोल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक सतिश डेहणकर यांनी घेतला पदभार

     वर्धा येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सतिश श्रीराम डेहणकर यांनी आर्वी येथील पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा तडकाफडकी पदभार सांभळला असुन त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासोबत प्रकरणाची चर्चा सुध्दा केली आहे.

व्यापाऱ्यांची धमकी ठरला फुसका बार

     अजय कदम व ॲड. दिपक मोटवाणी यांचा वैयक्तीक वाद असतांना सुध्दा येथील व्यापारी संघटनेने यात सहभाग घेतला आणी चक्क वर्धा जिल्हा पोलीस अधिकारी अनुराग जैन याना निवेदन दिली आणी ॲड. दिपक मोटवाणी यांनी दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button