पोलीस कारवाई

ॲड. दिपक मोटवाणी यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल, नेत्यांचा हस्तक्षेप व्यापारी सुध्दा उतरले मैदाना, वाद लिलावात घेतलेल्या मालमत्तेचा

पोलीस महानिरीक्षक खुद तपासा करीता हजर

याचा जागेचा सुरू आहे वाद

ॲड. दिपक मोटवाणी यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल, नेत्यांचा हस्तक्षेप

व्यापारी सुध्दा उतरले मैदाना, वाद लिलावात घेतलेल्या मालमत्तेचा

     आर्वी,दि.२७:- चार पाच लोक सोबत घरात शिरुन कुलूप लावल्याचा व महिलांसोबत अश्लील कृत्य केल्याच्या तक्रारीवरुन येथील पोलीसांनी ॲड. दिपक मोटवाणी आणी इतरांवर दरोडेखोरीसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणात नेत्यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा जोरात आहे तर दुसरीकडे व्यापारी सुध्दा मैदानात उतरले आहेत.

अजय कदम यांचे बस स्थानका लगतच्या वसंत नगर मध्ये प्लाट क्रमांक चार वर बांधलेले घर आहे. त्यांनी बँक ऑफ इंडियाला प्लॅटसह घर गहान ठेवून व्यवसायाकरीता कर्ज उचलले होते. त्या कर्जाची परत फेड न झाल्यामुळे बँकेने त्या घराचा लिलाव करुन रॉकेश लक्ष्मीचंद खत्री याला एक कोटी ५६ लाखात विकुन त्याची गुरूवारी (ता.२३) विक्री करुन दिला व जागेचा ताबा सुध्दा दिला.

   शनिवारी (ता.२५) ला ॲड. दिपक मोटवाणी हा चार पाच लोकांना सोबत घेवुन लगतच्या अजय कदम यांच्या मालकीच्या पाच नंबरच्या प्लॉट मधील घरात शिरला येथे मत्सव्यवयास सुरू असुन अजय कदम यांची पत्नी व सुन होती तिला धक्काबुक्की करुन व विनभंग  केला. या शिवाय सोबतच्या चार पाच लोकांनी सुध्दा अश्लील शब्दात शिवीगाळ केली. तसेच राम निस्ताने, बाजी निस्ताने, मत्सपालन असलेल्या खोलीत शिरुन अजय कदम व त्याच्या मुलाला सुध्दा मारहान केली. तसेच दहा हजार रुपये व मुलाच्या बोटातील सोन्याची अंगठी हिसकावुन घेतल्याची अजय कदम, कुणाल कदम, बाजी निस्ताने, राम निसताने व महिलांनी केलेल्या तक्रारीत नमुद आहे.

प्राप्त तक्रारीवरुन पोलीसांनी ॲड. दिपक मोटवाणी यांच्या विरोध्दात भारतीय न्याय संहिता (बी.एनएस) २०२३ कलम ३०९ (६), २९६ व ३३३ अन्वये गुन्ह्याची नोंद घेवुन तपास सुरू केला आहे.

पोलीस महानिरीक्षक खुद तपासा करीता हजर

     हे प्रकरण छोटस जरी असल तरी, यात नागपुरचे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी लक्ष घातले असुन त्यांनी घटना स्थळाला भेट दिली आहे. तर, मालमत्तेच्या दस्ताऐवजाची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय फिर्यादी व आरोपीची सुध्दा विचार पुस करुन माहिती घेत आहे. तर, वर्धा जिल्हा अधिक्षक जैन व सहाय्यक अधिक्षक सागर कडवे हे सुध्दा सकाळी दहा वाजता पासुन ठाण मांडून बसले असुन सखोल तपास करीत आहे मात्र वृत्त लिही पर्यंत कोणताही निर्णय पर्यंत पोहचल्याचे नाही.

राजकीय नेत्याचा हस्तक्षेप

     या प्रकरणात खासदार व सताधारी आमदार यांचा प्रत्यक्षपणे हस्तक्षेप होत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव निर्माण झाला असल्याने पोलीस महानिरीक्षक, वर्धा पोलीस अधिक्षक, सहाय्यक अधिक्षकांनी यांनी प्रकारणात लक्ष घातल्याची जोरदार चर्चा आहे.

बाजार बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

ॲड. दिपक मोटवाणी हे व्यापारी संघटनेचे विधी सल्लागार असुन त्यांच्याबचावा करीता व्यापारी संघटना सुध्दा उतरली आहे. त्यांनी पोलीस अधिक्षक जैन यांना निवेदन देवुन ॲड. दिपक मोटवाणी, करण मोटवाणी आदिंवर पोलीसांनी दबावा पोटी खोटा गुन्हा दाखल केल्याचे नमुद करुन उलट ॲड. दिपक मोटवाणी व इतरांवरच हल्ला झाला असुन त्यांची तक्रार पोलीसांना घ्यावी तसेच ॲड. दिपक मोटवाणी यांच्यावर दाखल केलेला गुन्हा पोलीसांनी मागे घ्यावा अन्यथा बाजार पेठ बद करुन आंदोलन करण्यात येईल अशी मागणी केली आहे.

आरोपीला अटक नाही

     रवीवारी (ता.२६) ॲड. दिपक मोटवाणी यांचावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन दोन दिवसा पासुन फक्त चौकशी सुरु आहे. आरोपी व फिर्यादि सुध्दा त्यांना या चौकशीत सहकार्य करीत असले तरी वृत्त लिहीपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही. एकीकडे तक्रार दाखल होताच आरोपीला अटक करुन चौकशी करणारी पोलीस या प्रकरणात का वेळ काढू पणा करीत आहे असा नागरिकांना प्रश्न पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button