दत्तोपंतजी ठेंगडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
उद्योजक्ता प्रेरणा दिवस साजरा, प्रावीण्यप्राप्त विध्यार्थ्यांचा सत्कार

आर्वी,दि.१४:- येथील दत्तोपंतजी ठेंगडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद व मॉ जिजाऊ यांच्या जयंतीदिनी रवीवारी (ता.१२) ‘’उद्योजक्ता प्रेरणा दिवस’’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रावीण्यप्राप्त विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील तहसीलदार हरिष काळे हे होते, तर, कला, वाणीज्य व विज्ञान महाविध्यालयाचे प्राचार्य रवींद्र सोनटक्के, आर. वी. परणकार अभियांत्रीकी महाविध्यालयाचे प्राचार्य रवी परणकर, तेजोवलय वृत्तपत्राचे संपादक दशरथ जाधव, संस्थेचे प्राचार्य तुषार लोखंडे, यशस्वी उद्योजक कैसर अंसारी हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
राजश्री मॉ जिजाऊ व स्वामीविवेकानंद यांच्या फोटोचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरूवात झाली.
यावेळी, तहसिलदार हरिष काळे यांनी मार्गदर्शन करतांना, कुठलही काम कमी दर्जाच नसल्याच सांगून ते आवडीने केले तर निश्चीतच यश पदरात पडते असे सांगीतले. जिवनात अनेक समस्या निर्माण होतात मात्र त्यामुळे खचुन न जाता पुढे वाटचाल करत राहायला पाहिजे. नौकरी अथवा उद्योग्य करायचा असेल तर त्यातील बारकावे ओळखुन काम केल्यास यश तुमच्या पुढ्यात उभ राहील असा सल्ला देवुन प्रशिक्षणाच्या माध्यमातुन आत्मसात केलेल्या ज्ञानाला योग्य न्याय दिल्यास राज्याच्याच नव्हे तर, देशाच्या विकासाला हातभार लागल्याशिवाय राहणार नाही असे सांगीतले.
प्राचार्य रवी सोनटक्के यांनी, जिवनात काहीही साध्य करायच असेल तर त्याकरीता कौशल्य आत्मसात असायला पाहिजे आणी ते या संस्थेच्या माध्यमातुन मिळत असल्याचे अवगत करुन दिले. मिळालेल्या या प्रशिक्षणाचा उपयोग पुढील जिवनात उद्योग करण्याकरीता करा असा सल्ला दिला आणी यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रचंड परिश्रम घेणे गरजेचे तर आहेच शिवाय स्वामी विवेकानंदजी व राजमाता जिजाऊ यांचे आदर्श आत्मसात करण्याची गरज आहे असे सांगीतले.
प्राचार्य रवी परणकर यांनी मार्गदर्शन करतांना, देशातच नव्हे तर जगाला सुध्दा कुशल काम करणाऱ्या मानव बळाची गरज भासत असल्याची जाण ठेवुन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९५१ मध्ये कौशल्य प्रशिक्षण संस्थेची निव ठेवली अशी माहिती दिली. परिणामी या माध्यमातून प्रशिक्षीतांकरीता अख्या जगाचे व्दार उघडे झाले असे सांगून बेरोजगारीच्या नावाने बोंब ठोकल्या पेक्षा मिळालेल्या प्रशीक्षणाच्या माध्यमातून यशस्वी व्हायचे असेल तर घर सोडायची तयारी ठेवावी लागेल असा सल्ला दिला आणी आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करुन महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच नाव जगात गेल्याशिवाय राहणार नाही अशी संभावना व्यक्त केली.
दशरथ जाधव यांनी मार्गदर्शन करतांना, नौकरी मिळवीण्याच्या उद्देशाने शिक्षण घेतल्या पेक्षा प्रशिक्षीत होवुन उद्योगाच्या माध्यमातुन नौकरी देणारे व्हायला पाहिजे अशी अपेक्षा वर्तवीली आणी याकरीता तुमच्यात घ्येय्य गाठण्याची जिद्द, चिकाटी व समयसुचकता असली तर हे सहज शक्य होवु शकते असे सांगीतले. स्वत:ला ओळखा आणी उद्योगाची कास धरा असा मंत्र दिला.
याशिवाय विजतंत्री व्यवसायातील माजी विध्यार्थी यशस्वी नवउद्योजक प्रतिक लिल्होरे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
प्राचार्य तुषार लोखंडे यांनी प्रस्तावना मांडतांन, संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली व प्रशिक्षणार्थींना आपले उद्दीष्ट साध्य करण्याकरीता ध्येय्यावर लक्ष केंद्रीत करुन पुढील वाटचाल केल्या पाहिजे असा सल्ला दिला.
यावेळी सहाय्यक अधिक्षक महेश हरणे यांनी प्रशिक्षणार्थीना स्वामी विवेकानंदाच्या जिवनपटा बद्दल माहिती दिली.
तर, विविध स्पर्धेच्या माध्यमातुन प्रावीण्य मिळवीणाऱ्या विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता शासकीय औध्योगीतक प्रशिक्षण संस्थेचया कु. ए. डी. वासनिक , जांभूळकर, मेश्राम, लिल्लोरे, बिसेन, सहारे, शेख, ताकसांडे, कु.डोंगरे, कु.इखार, शिल्पनिर्देशीका कु. गौसिया, गावंडे, शिरसाट कार्यालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी ओम राठोड व अंकुश वरखडे यांनी करुन आभार मानले.