वाहनांच्या अपघातावर नियत्रंण मिळवीण्याकरीता पथनाट्याव्दारे जनजागृती
सार्वजनिक बांधकाम विभाग व एन एक्स टी इन्फ्रा अमरावतीचा अभिनव उपक्रम वाहन धारकांना हेल्मेटचे केले वाटप

आर्वी,दि.१०:- ३६ व्या राष्ट्रीय अभियानांतर्गत वाहनांच्या अपघातावर नियंत्रण मिळविण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग व अमरावतीच्या एन एक्स टी इन्फ्राच्या संयुक्त विध्यमाने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पथनाट्य सादर करुन जनजागृती करण्यात आली. याला पोलीस विभागाचे सुध्दा सहकार्य मिळाले.
देशात वाहनांच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होत असुन यात जिवहानी व वित्तहानी होत आहे यावर नियंत्रण मिळवीण्याकरीता शासनाकडून व सामाजीक संघटनांकडून मोठ्याप्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक बांधकाम विभाग व एन एक्स टी इन्फ्रा अमरावतीच्या नाट्य कलाकारांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याव्दारे दारु पिवून व हेल्मेट चा वापर न करता वाहन चालवीतांना झालेल्या अपघातात होणारे दुष्परिणाम व हानीचे प्रभावीपणे सादरीकरण शिवांग मल्टिपर्पज फाउंडेशनच्या कलाकारांनी केले.
तसेच पोलीस उपनिरीक्षक सुनील राम व गितांजली गारगोटे यांनी मार्गदर्शन करतांना, १८ वर्षाच्या आतील मुलांनी गाडी चालवू नये व पालकांनी त्यांना गाडी चालवू देवून अशी सुचवीले आणी कायद्याची सुध्दा सखोल माहिती दिली.
तर, एन. एक्स. टी इन्फ्राचे एसपीव्ही हेड मुरली थंगीला, सुरक्षा अधिकारी सूरेंद्र गेडाम, युबीआय युनिबिल्डर मॅनेजर रुषभ राय, सुपरवायझर अनकम रमेश, गौरेश मेश्राम, ॠषिकेश साखरकर आदि यावेळी प्रामुख्याने उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे संचालन महेश भडांगे यांनी करुन मान्यवरांचे व प्रेक्षकांचे आभार मानले सोबतच माहिती पत्रकाचे वितरण करण्यात आले.
वाहन धारकांना हेल्मेटचे केले वाटप
छत्रपती शिवाजी चौकातून विना हेल्मेट घालुन वाहतुक करणाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग व एन एक्स टी इन्फ्राच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले याशिवाय विना हेल्मेट व दारु पिवूंन वाहने चालवू नका अशा सुचना सुध्दा दिल्या.