उर्वरीत काळात पत्रकारीतेच्या माध्यमातुन समाजसेवा करणार- सतीश शिरभाते
सेवा निवृत मुख्यध्यापक सतिश शिरभाते यांचा निरोप समारंभ

आर्वी,दि.८:- ग्रामीण विकास संस्था नागपूर द्वारा संचालित, येथील ठाकूर उमरावसिंह प्राथमिक शाळेचे सेवानिवृत मुख्यध्यापक सतिश शिरभाते यांच्या सन्मानार्थ शाळेच्यावतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उर्वरीत काळात पत्रकारीतेच्या माध्यमातुन समाजसेवा करणार असल्याचा निर्घार व्यक्त केला.
कन्नमवार शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक हिराचंद रेवतकर हे होते. तर, सेवा निवृत्त शिक्षक सुधाकर रेवतकर, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. वनिता निनावे हे प्रमुख अतिथी होते. या प्रसंगी सत्कारमुर्ती सतिश शिरभाते व पत्नी उषा शिरभाते यांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तु देवून सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक रेवतकर यांनी मार्गदर्शन करतांना, सतीश शिरभाते यांच्या ३३ वर्षाच्या सेवेचा लेखाजोखा मांडला, आणी एकाच ठिकाणी सेवा देणारे ते एकमेव शिक्षक असावे अशी माहिती दिली. या दरम्यान त्यांनी प्रायमीरी शाळेतील बाल वयाच्या विध्यार्थ्यांना घडवीण्याकरीता परिश्रम घेतले. ऐवढेच नव्हे तर, ज्ञान दानाच्या या मौलीक कार्यासोबत आपल्या लिखाणातुन पत्रकारीतेच्या क्षेत्रात सुध्दा एक वेगळा ठसा निर्माण केलेला असुन याचा वसा अवीरत चालु ठेवावा अशी अपेक्षा वर्तवीली.
सतीश शिरभाते यांनी सत्काराला उत्तर देतांना, शिक्षण याच शाळेत झाले आणी इथेच सेवा करण्याची संधी मिळाली या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली, आणी या दरम्यान इथल्या प्रत्येक शिक्षकाचे प्रेम आणि साथ मिळाली त्याच बरोबर बरच काही शिकायला मिळालं असल्याची माहिती दिली, याचा लाभ शैक्षणिक, व्यवसायिक व खाजगी जीवनात झाल्याची माहिती दिली. नोकरीच्या माध्यमातून समाजासाठी शाळेसाठी व संस्थेसाठी जी काही संधी मिळाली त्या बद्दल ऋणी असल्याचे सांगून, असेच प्रेम, सदिच्छा व मोलाची साथ निरंतर मिळत राहो अशी अपेक्षावर्तवील, तसेच निरोप समारंभाच्या माध्यमातुन सत्कार व सन्मान केल्याबद्दल आभार व्याक्त केले.
यावेळी कन्नमवार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अजय खंडाईत व ठाकूर उमरावसिंह शाळेच्या शिक्षिका नीलिमा लंगडे यांनी सुध्दा मनोगत व्यक्त करून उर्वरित आयुष्य निरोगी आणि सुखी समृद्धीचे जावो अशा शुभेच्छा दिलया.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश साव यांनी केले तर, आभार खंडाते सर यांनी मानले.
कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचारी उपस्थित होते