समाजाला प्रबोधन करण्याच्या तळमळीतूनच ‘दर्पण’ वृत्तपत्राची निर्मीती झाली उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट
समाजाची विश्वासहार्यता जोपासल्या शिवाय पत्रकारीतेला अर्थ नाही – प्रफुल व्यास पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकार विजय अजमिरे व दशरथ जाधव यांचा सत्कार डॉ. प्रकाश राठी व मित्र परिवाराच्यावतीने पत्रकार दिनाचे आयोजन

मार्गदर्शन करतांना उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट
आर्वी,दि.८:- पारतंत्र्याच्या काळात मराठी भाषीक समाजाला माहिती पोहचवीणारे माध्यम नसल्याने बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजाला प्रबोधन करण्याच्या तळमळीतून ‘दर्पण’ या वृत्तपत्राची निर्मीती केली होती. असे येथील उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांनी येथे प्रतिपादन केले.
बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिना निमीत्त संपादक डॉ. प्रकाश राठी व मित्र परिवाराच्यावतीने सोमवारी (ता.सहा) येथील मोहन गार्डन रेस्टॉरेंट मध्ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार तथा संपादक विजय अजमीरे व दशरथ जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणुन मार्गदर्शन करीत होते.
पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकार विजय अजमिरे व दशरथ जाधव यांचा सत्कार करतांना मान्यवर
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जोशी हे होते. तर, तरुण भारताचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी तथा महाराष्ट्र अधिस्वीकृती पत्रकार समितीच्या नागपुर विभागाचे सदस्य प्रफुल व्यास, आर्वी तालुका पत्रकार संघटनेचे कोषाध्यक्ष सतीश शिरभाते, प्रेस क्लबचे अध्यक्ष नितीन आष्टीकर, आर्वी तालुका पत्रकार संरक्षण समितीचे राजेश सोळंकी हे प्रमुख अतिथी होते.
पुढे मार्गदर्शन करतांना त्यांनी, आता देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष झाली सोबतच माहिती तंत्रज्ञात सुध्दा मोठ्याप्रमाणात बदल झाला. प्रसिध्दीच्या क्षेत्रात ईलेक्ट्रॉनिक मिडीयाने शिरकाव केला. मात्र अशाही अवस्थेत पत्रकारांच्या जोरावर प्रींटमिडीयांने आपली जागा कायम ठेवली असल्याचे सांगुन गत निवडणुकीच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली हा स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या प्रसिध्दीचा परिणाम असल्याची सुध्दा कबुली दिली. सोबतच महिला पत्रकार नसल्याबाबत खंत व्यक्त केली.
समाजाची विश्वासहार्यता जोपासल्या शिवाय पत्रकारीतेला अर्थ नाही – प्रफुल व्यास
पत्रकारीतेच क्षेत्र हे समाजाकरीता आरश्याच काम करते. या आरशा पुढे उभ्या असलेल्या व्यक्तीची प्रतिमा जशी दिसते तसा तो आहे काय याची माहिती घेवुन लिहायला पाहिजे अस आम्हाला वाटते मात्र वृत्तपत्र मालकांना काय पाहिजे हे यावेळी महत्वाच ठरते आणी अशा वेळी पत्रकारांना अडचण निर्माण होते हि वस्तुस्थीती आहे. तर, दुसरीकडे आता समाजमाध्यमाचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे. यातुन वाचायचे असेल तर, समाजासोबत जुळवून घेवुन त्यांचे प्रश्न मांडण्याकडे लक्ष केंद्री करणे गरजेचे आहे अन्यथा पत्रकारीतेला अर्थ उरणार नाही. परिणाम कारक बातमी लिहायला गेलं की पत्रकारांवर अनेक आरोप होतात मात्र अशा वेळी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहत नाही मात्र अशाही अवस्थेत पत्रकारांनी सामाजाच आपण देण लागतो याची ठेवायला पाहिजे असे तरुण भारत या वृतपत्राचे वर्धा जिल्हा प्रतीनिधी प्रफुल व्यास यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले.
अनिल जोशी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. जांभेकर यांनी कमी वयात मोठे कार्य केले ते विद्वान होते इंग्रजांच्या काळात त्यांनी नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता व सामाजिक समस्येबाबत जनजागृती करीता वर्तमानपत्र काढले. सोबतच भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र आदि विषयावर सुद्धा लिखाण केल्याची माहिती दिली.
सत्काराला उत्तर देतांना दशरथ जाधव
दशरथ जाधव यांनी सत्काराला उत्तर देतांना पत्रकारीता क्षेत्रात कार्य करतांना आलेल्या अनुभवाची व अडचणीची माहिती दिली. सोबतच तुमच्या लेखणीत दम असले तर समाजाच्या हिता करीता तुम्ही आमदार, खासदारच काय तर, बड्याबड्या अधिकाऱ्यांना सुध्दा धडा शिकवून न्याय मिळवून देवु शकता अशी माहिती दिली. तर, विजय अजमीरी यांनी सुध्दा आपले अनुभव कथन करुन पत्रकारांची प्रतीमा कशी मलीन केल्या जात आहे याची माहिती दिली.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाला सुरूवात झाली.
डॉ. प्रकाश राठी यांनी प्रस्तावना मांडतांना गत तीन वर्षा पासुन पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यात जेष्ठ पत्रकारांचा सन्मान सुध्दा केल्या जातो असे सांगुन पुढे मोठ्या स्वरुपात हा कार्यक्रम घेण्याचा मानस जाहीर केला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभय दर्भे यांनी केले तर आभार प्रमोद ऐडाखे यांनी मानले.