भीमा कोरेगाव शैर्यदिनी शेकडो लोकांनी शहिदांना दिली मानवंदना
२२ फुट उंचीची शौर्यस्तंभ प्रतिकृती उभारली तर, शहरातून काढली भव्य मिरवणूक

आर्वी,दि.३:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती निर्माण व देखरेख् समिती तथा समाज बांधवांच्यावतीने आणी युवकांच्या पुढाकाराने बुधवारी (ता.एक) भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औच्यीत्य साधुन निर्माण केलेल्या २२ फुट उंचीच्या स्तंभ प्रतिकृती समोर शहिदांना मानवंदना देण्यात आली तर, शेकडो समाज बांधवाच्या सहभागाने भव्य मिरवणुक काढण्यात आली.
एक जानेवारी १८१८ मध्ये पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांचा ५०० महार शुरवीरांनी सामना करीत अवघ्या १२ तासात लढाई जिंकली यात २० जवान शहिद झाले तर ३ जख्मी झाले त्यांच्या सन्मानार्थ भिमा कोरेगाव येथे ७५ फुट उंचीचा विजय स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यांचीच २२ फुट उंचीची प्रतिकती येथील नगर परिषद कार्यालयासमोरी प्रांगणावर युवकांच्या परिश्रमाने निर्माण करण्यात आली होती. आल इंडिया समता सैनिक दलाच्या पुरूष व महिला दलाने आणी समाज बांधवांनी या प्रतीकृतीला पुष्प अर्पण करुन मानवंदना दिली. तद्नंतर जय भीमचा गजर करीत मिरवणुक काढण्यात आली. यात तथागत भगवान गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, सम्राट अशोक आदिंच्या सजावट केलेल्या ट्रॉलीसह शेकडो पुरूष, महिला, तरुण, तरुणी समाजबांधव सहभागी झाले होते. हि मिरवणुक गौरक्षण वार्ड, बालाजी वार्ड, मायबाई वार्ड, पंचवटी, दत्तवार्ड, गुरूनानक चौक, जनता नगर, आंबेडकर वार्ड, विठ्ठल वार्ड होत निघाली आणी नगर परिषद कार्यालयासमोर समारोप झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन दर्पण टोकसे, प्रवीण काळे, दीपक ढोणे, अमरदीप मेहरे, सौरभ टोकसे, रवी गाडगे, सागर मोटघरे, आकाश वाघमारे, अजय बोंद्रे, गौतम मेश्राम , प्रमोद चौरपगार, अनिल माहूरे, गौतम कुंभारे, निरंजन पाटील, दिनेश सवाई , सुजित भिवगडे, सचिन पाटील, मंगेश सरोदे, सूरज डोंगरे, तुषार तळेकर, गजानन वावरे, संदीप पाटील, प्रवीण मनवर, विजय धुळे, गौतम पोहणे, रोहित बांबुडकर, सूरज मेहरे, प्रतीक नाखले, किरण कोल्हे, सुमित वाघमारे, अरविंद वाघमारे, विलास बेंडे, अजय वाघमारे, अनिकेत बांबूडकर, ईशांत हाडके, तेजस मोटघरे, साक्षात हाडके, अभय गायकवाड, रोहित रामटेके, आकाश सवाई, अभिषेक दहाट, विक्रम मेश्राम, संदीप सरोदे, मिलिंद मेहरे, प्रमोद घोडेस्वार, प्रज्वल सोनुले, कुंदन वासनिक, उमेश मेश्राम, लोकेश भगत, मोणू हुमे, सूरज सौदागर, संदीप दहाट,विशाल शेंडे, सागर गोपाळे व बौद्ध समाज बांधव व ऑल इंडिया समता सैनिक दल शाखा आर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निर्माण देखरेख समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले होते.
या मिरवणुकीत सिद्धार्थ बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड, ,सावित्रीबाई फुले जनता नगर, सम्राट अशोक लक्ष्मीबाई वार्ड, भीमोदय दत्तवाड, भिमाई मायबाई वार्ड, बोधी छाया महाराणा प्रताप वार्ड, प्रबुद्ध बुद्ध गौरक्षण वार्ड, महाप्रजापती गौतमी वाल्मीक वार्ड, त्रिशरण स्टेशन वार्ड, सिद्धार्थ कन्नमवार नगर, तक्षशिला संजय नगर, तक्षशिला आंतर डोह पुनर्वसन, रमाई भादोड पुनर्वसन, या सर्व बुद्ध विहारातील अनुयायी आदिंनी सहभाग नोंदवीला