Uncategorized

सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकली आर्वीची महिला विदेशातुन आलेले गिफ्ट पकडल्याची केली बतावणी; २७ लाख 3८ हजाराने केली फसवणुक

ऑनलाईनचा नाद सोडून सावध राहणे गरजेचे

     आर्वी,दि.२६:- विदेशातुन पाठवीलेल गिफ्ट कस्टम पोलीसांच्या हाती लागले असुन त्यात विदेशी चलनाचे नाणे असल्याची बतावणी केली. या माध्यमातुन घाबरलेल्या येथील एका सुखवस्तु घरातील महिलेकडून तब्बल २७ लाख ३८ हजार रुपये उकळले. मात्र जेव्हा त्या महिलेला आपली फसवणुक होत असल्याचे कळले तेव्हा तिन सायबर पोलीसात तक्रार दाखल केली असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन शॅपिंगच्या माध्यमातुन नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होत आहे. लॉटरी लागली, गिफ्ट करीता पात्र ठरलात आदिंची बतावणी करुन जाळ्यात अडकवीण्याचा प्रकार वाढला असुन या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थीक फसवणुक केल्या जात आहे.

असाच प्रकार येथील एका सुखवस्तु घरातील महिले सोबत घडला आहे. इन्स्ट्राग्रामच्या माध्यमातुन या महिलेचा एका अज्ञात व्यक्तीशी ओळख झाली, बोलचाल सुरू झाली, परिणामी विश्वास सुध्दा वाढला. अशातच त्याव्यक्तीने तुम्ही विदेशी गिफ्ट करीता पात्र ठरल्या असल्याची माहिती  देवुन गिफ्ट पाठवील्याचे सांगीतले. काही दिवसानंतर, तो गिफ्ट तपासणीत कस्टम विभागाच्या हाती लागला असुन त्यात विदेशी चलनाची नाणी असल्याने गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. यातुन सुटका करुन घ्यायची असेल तर, तुम्हाला विविध प्रकारचे टॅक्स भरावी लागतील अशी माहिती दिली. अचाणक घडलेल्या या प्रकाराने महिला चांगलीच घाबरली आणी यातुन सुटका करुन घेण्याकरीता तीने मागणी करणाऱ्यास वेळोवेळी तब्बल २७ लाख ३८ हजार रुपये दिले. सध्या पोलीसांच्या माध्यमातून अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रसारीत केल्या जात आहे. याच माध्यमातुन तिला आपली फसवणुक झाली असल्याचे लक्षात आले आणी तिन सायबर पोलीसाकडे याची तक्रार दाखल केली आहे.

या प्रकारणी अज्ञात व्यक्ती विरुध्द सायबर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन तपास सुरू केला आहे.

ऑनलाईनचा नाद सोडून सावध राहणे गरजेचे

ऑनलाईन खरेदी सुरू झाल्या पासुन विविध  प्रकाराचा वापर करुन नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होत आहे. पुर्वी ओटीपी मागुन सरळ बँकेच्या खात्यातुन पैसे लंपास करण्याचा प्रकार घडत होता. आता सायबर गुन्हेगारांनी बदल केला असून  मोबाईल नंबर, फेसबुक, इन्स्टाग्राम आदिंच्या माध्यमातून संपर्क साधुन लॉटरी लागल्याची, गिफ्ट मिळाल्याच सांगीतल्या जाते आणी पाठवील्या नंतर तो गिफ्ट पोलीसाच्या हातात लागल्याची बतावणी करुन घाबरवील्या जाते. त्याच्या मागणी प्रमाणे यातुन सुटका करुन घेण्याकरीता आपसूकच मोठ्या प्रमाणात आर्थीक लुबाडणुक केल्या जात आहे. नागरिकांना वेळोवेळी सजग करण्याचा प्रयत्न पोलीसांकडून केल्या जाते मात्र विदेशी वस्तुंच्या हव्यासापोटी आणी मोफतच्या आमीशापोटी नागरिक अलगद त्याच्या जाळ्यात अडकल्या जाते असल्याने सर्वांना सावध राहण्याची गरज आहे.

    

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button