आदर्श एकता सामाजीक संघटनेने संत गाडगे महाराज यांची पुण्यतीथी केली साजरी

आर्वी,दि.२५:- येथील आदर्श एकता सामाजीक संघटनेने परिवर्तनवादी, कर्मयोगी, थोर समाजसेवक संत गाडगे महाराज यांची पुण्यतीथी शुक्रवारी (ता.२०) विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी केली.
त्रिशरण बुध्द विहार भिमसैनिक अशोकराव कुंभारे परिसरात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन गौतम कुंभारे यांनी केले होते. संत गाडगे महाराज यांच्या फोटोचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी गौतम कुंभारे यांनी संत गाडगे यांच्या जिवन चारित्र्यावर प्रकाश टाकतांना सांगीतले की, संत गाडगे बाबा यांनी प्रवाहाच्या विरुध्द जावुन समाजातील अंधश्रध्दा दुर करण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या रुढी परंम्परा आदिंवर वऱ्हाडी भाषेत किर्तनाच्या माध्यमातून घाणाघात केला ऐवढ नाही तर शिक्षणाचा प्रचार व प्रसार करुन समाजाने शिक्षीत व्हायला पाहिजे या करीता प्रयत्न केल्याची माहिती दिली. याशिवाय लहान बालकांनी सुध्दा विचार मांडले.
कार्यक्रमाला निर्मला कुंभारे, सुमन मसराम, चंदा डोंगरे, सुलुचना कुंभारे, चंदा सरोदे, कविता कर्नाके, मेघा सरोदे, सीमा गोंडणे, छकुली माहुरे, मनोज गोंडणे, मंगेश सरोदे, राहुल मनवर, नितीन, श्याम गोंडेलवार, सेजल डोंगरे, राकेश वर्टी, पूर्वेश गोंडाने, दिवेश कुंभारे, आदर्श कुंभारे, व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते आले.
कार्यक्रमाचे संचालन शुभांगी गौतम कुंभारे यांनी केले तर आभार जया सरोदे यांनी केले या