देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी जगल पाहिजे, आमच सुख दुसऱ्याच्या सुखात पाहिल पाहिजे – प्रवचनकार सोपन महाराज
शेकडो भावीक महिला, पुरूषांनी हजेरी लावली आणी तल्लीन होवून प्रवचनाचा आनंद घेतला.

आर्वी,दि.२५:- तुम्ही किती दिवस जगता हे महत्वाच नाही तर तुम्ही कसे जगता हे महत्वाच आहे. देवा साठी, देशा साठी धर्मा साठी जगल पाहिजे. समाजाला तुमचा आदर वाटल पाहिजे अवघाची संसार सुखाचीया व्हावा या प्रमाणे दुस-याच्या सुखात आपल सुख पाहिल पाहिजे असा संदेश अमरावती येथील प्रवचनकार सोपन महाराज कन्हेरकर यांनी मंगळवारी (ता.२४) येथे दिला.
परमहंस श्री संत मायबाई महाराज यांचा व्दिशताब्दी महोत्सव, श्री संत पांडूरंग महाराज यांची २२५ वी पुण्यतिथी व श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्म शताब्दी सोहळ्या निमीत्त मायबाई वार्डातील प्रांगणावर आयोजीत सांगता समारोह कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते.
यावेळी सचीन देव महाराज, माजी आमदार दादाराव केचे, आयोजक सुधीर दिवे, प्रा. डॉ. नारायण निकम, अनिल जोशी, सुनील नाथे, डॉ. देशपांडे, माजी प्राचार्य विरुळकर, कृष्णा गिरधर आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे त्यांनी प्रवचन करतांना, हिंदुत्वाची परिभाषा सांगून ज्या प्रमाणे माते मध्ये ममत्व, पित्यामध्ये पितृत्व असते त्याच प्रमाणे प्रत्येक हिंदु मध्ये हिंदुत्व रुजल्या पाहिजे. हिंदुत्वासाठी प्रत्येकाने समर्पीत व्हायला पाहिजे अशी अपेक्षा वर्तवीली. मरण हे अंतीम सत्य आहे हे अनेक उदाहरणे देवुन त्यांनी पटवून दिले आणी सामाजाच्या देण्यासोबतच भगवंताच देण लागत असल्याचे सांगीतले. या शिवाय दानाच महत्व, योग्य वेळ साधने, समाजाच देणे लागन, आभुषणावर गर्व न करणे, आपली संस्कृती जपणे, टिकली आणी टिक्याच महत्व आदि विषयावर उदाहरणासह माहिती तर दिलीच शिवाय संभाजी महाराज यांच्यावर अफजल खानाने केलेल्या अत्याचाराच चित्र हुबेहुब उभ करण्याचा सुध्दा यशस्वी प्रयत्न केला.
प्रवचनकार सोपान महाराज यांना गायणाचार्य कालेयाचे किर्तनकार हं.भ.प. संजय महाराज ठाकरे आळंदिकर, संतोष महाराज सुरजूसे, मुदगाचार्य अंकुश महाराज आळंदिकर, शंकरराव महाराज थेटे, गजानन महाराज बुरघाटे तथा अन्य भजन मंडळींनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाला शेकडो भावीक महिला, पुरूषांनी हजेरी लावली आणी तल्लीन होवून प्रवचनाचा आनंद घेतला.