राष्ट्रीय महामार्गावरील दिशा दर्शक फलकाला टिप्परची धडक
१२ लाख रुपयाचे झाले नुकसान, वाहन चालक पोलीसांच्या ताब्यात

आर्वी,दि.१४:- राष्ट्रीय महामार्ग आर्वी वर्धा रोड वरील टि पांईट लगत असलेल्या दिशा दर्शक नाम फलकाला टिप्परच्या हॅड्रोलीक ट्रॅलीची धडक देवुन वाहन चालकाने वाहनासह पलायन केले. यात सुमारे १२ लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची तक्रार येथील पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असुन वाहन चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळी साडे आठ वाजताचे सुमारा हि घटना घडली.
धनराज दारोकार असे वाहन चालकाचे नाव असुन तो आर्वी येथील रहिवासी आहे. तर, एम.एच-४० ऐके ६८९६ या मालवाहु टिप्परच्या ट्रॉलीने सुमारे १६ फुट उंच असलेल्या दिशादर्शक नाम फलकाला धडक दिली असुन कहारे असे वाहन मालकाचे नाव आहे. सकाळी ८ वाजताचे सुमारास वाहन चालक धनाराज दारोकार हा खाली टिप्पर सहकार मंगल कार्यालयाच्या प्रांगणाजवळुन राष्ट्रीय माहामार्गाने टि पांईट कडे जात होता. याच दरम्यान अचानक टिप्परची हैड्रोलीक वर आली आणी तिची धडक नाम फलकाला बसली यात लोखंडी आधार स्तंभ बुडाजवळून वाकल्याने नामफलक लगत उभ्या असलेल्या एका ट्रकवर कोसळले. मात्र याची पोलीसांना सुचना न देताच वाहन चालकाने वाहन ट्रॉली खाली करुन पलायन केले.
आर. पी. पी. इन्फ्रा प्रोजेक्टस लि. चेन्नईचे साईड इंजिनिअर कैलाश शंकर शहा यांनी याची तक्रार केली असुन पोलीसांनी वाहन चालक याला ताब्यात घेतलेले आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
बाजुला ट्रक नस्ता तर मोठी दुर्धटना घडली असती
दिशा दर्शक फलकाजवळ दहा चक्का ट्रक उभा होता. धडक बसताच दिशा दर्शक फलक या ट्रकवर कासळल्यामुळे तो जमीनीवर पडला नाही. नाही तर टिप्परचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असते आणी या मार्गाने वाहतुक करणाऱ्यांच्या जिवीताची हानी झाली असती.