आमदार बनताच सुमीत वानखेडे यांनी घेतली जन आरोग्याची दक्षता सहा नवीन रुग्णवाहिकेंचे केले लोकार्पण
आर्वीच्या रुग्लालयाचे विस्तारीकरण व १०० बेडच हॉस्पीटल

आर्वी,दि.१२:- विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागातील रुग्णाची सोय व्हावी याकरीता राज्य सरकारच्या आरोग्य विभागा मार्फत प्राप्त करुन घेतलेल्या सहा नवीन रुग्णवाहीकांचे लोकार्पण बुधवारी (ता.११) करण्यात आले असून सुमीत वानखेडे यांनी आमदार बनताच जन आरोग्याची दक्षता घेतल्याचे बोलल्या जात आहे.
या लोकार्पण साहेळ्याला वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर याशिवाय आरोग्य विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्राप्त झालेल्या रुग्णवाहिके पैकी तळेगाव (शा.पं.), नारा, कन्नमवारग्राम, रोहण व खरांगणा येथील प्राथमीक आरोग्य केंद्रासाठी कार्यरत राहणार आहे तर, आर्वी पी.एम. जन-मन योजनेअंतर्गत प्रदान करण्यात आलेली एक फिरती रुग्णवाहीका हि आर्वी तालुक्यातील आरोग्य कार्यालयासाठी आरक्षीत आहे.
या रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध असल्याने आरोग्यसेवेत गतीशिलता तर येणार आहेच शिवाय वेळेवर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करुन घेण्यास मदत होईल.
चांगली व वेळेवर आरोग्य सेवा मिळने नागरिकांकरीता गरजेचे आहे आणी म्हणुनच सुमीत वानखेडे यांनी आमदार होताच जन आरोग्याच्या दृष्टीने उचललेल्या प्रथम पाऊलाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.
आर्वीच्या रुग्लालयाचे विस्तारीकरण व १०० बेडच हॉस्पीटल
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळालेली असली तरी बांधकाम पुर्ण होई पर्यंत रुग्णसेवा कुठे हलवीण्याकरीता पर्यायी जागा उपलब्ध नस्ल्याने ते थांबलेल आहे यावर त्वरीत तोडगा काढण्यात यावा व तळेगाव येथे मंजुर केलेल्या १०० बेडच्या रुग्णालयाचे काम त्वरीत सुरू करुन लोकांच्यासेवेत तातडीने उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी नागरीकांची आहे.