***उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलीस दल व होमगार्ड पथकाचे शहर परिक्रमण*** उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, पोलीस कर्मचारी व होमगार्ड सैनीक होते सहभागी***

आर्वी,दि.१:- पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव सुरू आहे तर याच दरम्यान ईद-ए-मिलाद दुन्नबी चा जुलूस सुध्दा निघतो हे दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पडावे याकरीता सोमवारी (ता.एक) पोलीस दल व होमगार्ड पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत ढोले व ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या नेतृत्वात शहराच्या मुख्य रस्त्याने परिक्रमण केले.
गणेश उत्सवा निमीत्त पोलीस स्टेशन हद्दी मधील मंडळांनी सुमारे ५४ गणेश मुर्त्या स्थापीत केल्या आहेत तर, सुमारे दोनशेच्यावर घरगुती गणपतीआहेत. गणेश विसर्जना दरम्यानच ईद-ए-मिलाद दुन्नबीचा कार्यक्रम सुध्दा आहे. हे दोन्ही कार्यक्रम आनंदात व निर्विघनपणे पार पडावे तसेच असामाजीक तत्वांवर वचक निर्माण व्हावा याकरीता पोलीसाच्यावतीने मार्ग परिक्रमण करण्यात आले.
९ पोलीस अधिकारी, ५० अमलदार, आरसीपी पथ, एसआरपीएफ प्लाटुन, ६० होमागार्ड सैनीक व वाहनांचा ताफा दुपारी एक वाजता वाल्मीक वॉर्ड, कुरेशी मोहल्ला, मायबाई वार्ड, श्रीराम वार्ड, अवलीया मस्जीत, गुरूनानक चौक, जनता नगर, नुरी मस्जीद, इंदिरा मार्केट, गांधी चौक होत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचला. संपुर्ण परिक्रमणा प्रभावी पणे राबवीण्यात आली.