Maharashtraशासकीय उपक्रम

*** “स्वच्छता ही सेवा पंधरवाडा २०२५” अभियानाचा शुभारंभ ***गुरूवारी (ता.१८) छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाले उद्घाटन ***माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, समाजसेवक नादारद, गांधी विध्यालयाच्या विध्यार्थ्यांची उपस्थीती***

***आदिवासी आरक्षणाची चर्चा व निवडणुका चार महिण्यावर गेल्याच परिणाम***

आर्वी,दि.१८:- राज्य शासनाच्या निर्देशानुसार  येथील नगर परिषदेच्यावतीने “स्वच्छता ही सेवा पंधरवाडा” अभीयान राबवीण्याची मोहीम हाती घेतली असुन गुरूवारी (ता.१८) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांच्या हस्ते या मोहीमेचे उद्घाटन झाले. यावेळी गांधी विध्यालयाचे विध्यार्थी उपस्थीत होते मात्र भाजपचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक याशिवाय उत्सुक्त असलेले नवनवे समाजसेवक नादारद असल्याने शहरात चर्चेला उधान आले आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन राज्य सरकारने राज्य भर बुधवार (ता.१७) पासुन “स्वच्छता ही सेवा पंधरवाडा २०२५” अभियान राबवीण्याचा निर्णय घेतला. एक आक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या या अभियानाला गुरूवारी (ता.१८) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन सुरूवात झाली. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह गांधी विध्यालयाच्या विध्यार्थ्यांनी साफसफाई सुरू केली.

तत्पुर्वी मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांनी सुचना पत्र काढुन व सोशल मिडीयाच्या माध्यमातुन याची माहिती पत्रकार, व्यापारी संघटना, शहरातील नागरिक, माजी नगराध्यक्ष, नगर सेवक, आदिंपर्यंत याची माहिती पोहचवीण्याचा पर्यंत्न केला. मात्र भाजपा पक्षाचे माजी नगराध्यक्ष, नगर सेवक तर सोडाच येत्या निवडणुकीवर डोळा ठेवुन स्व्त:हुनच नव्याने निर्माण झालेले समाजसेवकांनी सुध्दा याकडे पाठ फिरवील्याने चौकाचौकात खमंग चर्चेला सुरूवात झाली आहे.

आदिवासी आरक्षण व निवडणुका चार महिण्यावर गेल्याचा परिणाम

            गत सहा महिण्यापासुन नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदावर डोळा ठेवुन नवनवीन समाज सेवक तसेच माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आदि समाज कार्यात हिरेरीने भाग घेत होते. मरण असो, गणपती महोत्सव असो, कुठलाही सामाजीक कार्यक्रम असो निमंत्रण नसतांना सुध्दा यांची हजेरी प्राथमीकतेने दिसुन येत होती. कार्यक्रम स्थळी आपली उपस्थीतीची जाणीव करुन देण्याकरीता नवनवीन प्रयोग केल्या जात होते. मात्र गुरूवारी (ता.१८)  स्वच्छता मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी सगळे नादारद होते. नगराध्यक्ष पदाची माळ अनुसूचीत जमातीच्या महिला उमेदवाराच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा सुरू झाल्याचा व निवडणुका चार महिणे लांबणी पडल्याचा तर हा परिणाम नव्हे ना? अशी जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button