***पीएमश्री गांधी विध्यालयाचा व्हॉलीबॉल संघ जिल्हास्तराकरीता पात्र****तालुका स्तरीय १७ वर्ष वयोगटातील स्पर्धेत ठरला अव्वल***

आर्वी,दि.२:- येथील तालुका क्रिडा संकुलनाच्या मैदावर क्रीडा विभागाच्यावतीने शनिवारी (ता.३०) घेण्यात आलेल्या १७ वर्षीय वयोगटाच्या तालुका स्तरीय व्हॉलीबाल स्पर्धेच्या अंतीम सामन्यात पि एम श्री गांधी विध्यालयाचा व्हॉलीबाल संघ अव्वल राहीला असुन तो जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता पात्र ठरला आहे.
शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने गुरूवारी (ता.१८) व्हॉलीबॉलची स्पर्धा आयोजीत केली होती. यावेळी आलेल्या पावसामुळे स्थगीत केलेले सामने पुन्हा शनिवारी (ता.३०) घेण्यात आली. यातील १७ वर्षीय वयोगटातील अंतीम सामन्यात पिएमश्री गांधी विध्यालयाच्या संघातील हर्ष मेहेरे, रुद्र तायवाडे ,कुणाल खेडकर ,नैतिक वानखेडे, श्रवण दोडंगे ,आराध्या जळीत , प्रणय काळे, रुद्राक्ष दिघडे ,प्रथमेश दहाट आणि मृणाल बोंडे या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळ करुन विध्यानिकेतन इंग्लिश स्कुलच्या संघाचा दणदणीत पराभव करुन तालुका स्तरावर अव्वल ठरला आहे आणी जिल्हास्तरीय सामन्याकरीता पात्र झाला आहे. यामुळे खेळ विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खेळाडूंनी आपल्या या यशाचे श्रेय शारीरिक शिक्षक नंदकिशोर गोडबोल व कदम यांना दिले आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, गांधीविध्यालयाचे प्राचार्य विश्वेश्वर पायले, पर्यवेक्षीका कु. ज्योती अजमीरे तथा शिक्षकांनी विजय संघाचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.