*** मुख्यमंत्री समृघ्द पंचायत राज अभियाना अंतर्गत बेलगावला ग्रामसभा ***
*** मोठ्या संख्येने नागरिक होते उपस्थीत *** अनेक विषयांवर झाली चर्चा ***

कारंजा (घा.),दि.१८:- मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियाना अंतर्गत बेलगाव येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ग्राम विकासाच्या अनेक शासकीय योजनांवर सखोल चर्चा झाली यावेळी ग्रामपंचायत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
या सभेत मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाचे महत्व पटवुन देत गावाचा विकास कसा साधता येतो याची माहिती दिल्या गेली. तसेच याची अमंलबजावणी कशी करता येईल यावर सुध्दा चर्चा करण्यात आली. याशिवाय हे अभियान योग्य पध्दतीने व परदर्शीपणे राबवीण्याकरीता ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक युवती यांना यात कसे सहभागी होता येईल याची सुध्दा माहिती देण्यात आली.
सरपंच स्वप्नील खवशी, उपसरपंच मनोज सिरसाम, सदस्य शुभम आत्राम, विमल आत्राम, संगीता कुंभरे, दुर्गा खवशी, अर्चना आमझिरे, धिरज मुरखे, ग्रामविकास अधिकारी रमेश सावरकर, कारंजा पंचायत समिती मनरेगा विभागाच्या श्रीमती साव, पोलीस पाटील गोदावरी आत्राम, मुख्याध्यापक गजाम, कृषी सहाय्यक चाटे, वन विभागाच्या श्रीमती ढोके, आरोग्य सेवीका घरडे, अंगणवाडी सेविका विध्याताई सिरसाठ, आशा सेवीका रंजना आत्राम, महिला बचत गट अध्यक्षा, सचिव मनीषा गायकवाड, आदिंची प्रामुख्याने उपस्थीती होती.