*** मदतीचा हात दिला तर, माती मधुन सोन पिकवायची ताकत शेतकरी ठेवतात – उपेंद्र कोठेकर- *** एपीएमसीच्या स्वनिधी मधुन केलेली विकास कामे व शेतकरी योजनांचे उद्घाटन ***
***इंटेलीजन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेण्याची गरज आहे – सुधीर दिवे***शेतकऱ्यांच उत्पन्न एक लाख पर्यंत नेण्याचा उद्देश- सुमीत वानखेडे *** विरोधकांच्या अडथळ्याला न घाबरता ध्येय्य गाठणार – संदिप काळे ***

आर्वी,दि.१९:- सहकारी संस्थांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांकरीता मदतीचा हात दिल्या गेलं तर ते मातीमधुन सोन पिकवायची ताकत सुध्दा ठेवतात हे सांगण्याची गरज नाही, आणी याची जाण ठेवुन बाजार समितीच्या माध्यमातुन शेतकरीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या मुलांचा सुध्दा विचार करुन कल्याणकारी योजना राबवीण्याचा प्रयत्न करणारे संदिप काळे व त्यांची टिम खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र ठरतात असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक तथा भाजपचे विदर्भ विभाग संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी येथे केले.
कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या स्वनिधीमधुन केलेल्या विविध विकास कामांचा सोहळा व शेतकरी हितावह योजनांचे उद्घाटन शुक्रवारी (ता.१९) उपेंद्र कोठेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
समितीच्या मार्केट यार्डवर झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुमीत वानखेडे हे होते तर, अमरावतीच्या अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटल चे उपाध्यक्ष तथा भाजप राज्य कार्यकारणीचे सदस्य सुधीर दिवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदिप काळे, उपसभापती प्रशांत वानखेडे, बांधकाम सभापती मधुकर चौकणे, संचालक भिमराव कुऱ्हाडे, विजयराव गुल्हाणे, गजानन जावळेकर, प्रज्वल कांडलकर, शिरीष महल्ले, सौ. गायत्री बोके, मंगेश मानकर, बाळा सोनटक्के, संतोष सिराम, मधुकर सोमकुवर, लखण अग्रवाल, चेतन टावरी, दिलीप भुसारी हे प्रमुख अतिथी होते.
पुढे मार्गदर्शन करतांना त्यांनी, प्रामुख्याने विदर्भातल्या,मराठवाड्यातल्या शेतकऱ्यामध्ये प्रचंड मेहनत करण्याची ताकत आहे असु सांगुन, हे त्यांनी वारंवार सिद्ध करून दाखवलेल्याची माहिती दिली. मात्र त्या शेतकऱ्याला वेळोवेळी मदतीची आवश्यकता असते आणि मदत सातत्याने शासनाकडून होऊ शकत नाही पण अशा वेळी सहकारी संस्थांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे झाला तर नक्कीच शेतकरी सुखी व समाधानी झाल्या शिवाय राहणार नाही असे आवाहन त्यांनी केले.
इंटेलीजन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेण्याची गरज आहे – सुधीर दिवे
यावेळी सुधीर दिवे यांनी मार्गदर्शन करतांना, शेतातुन मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवायच असेल तर नव नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेण्याची गरज असल्याची अपेक्षा वर्तवीली. जर शेतकऱ्यांनी आधुनीक इंटेलीजन्स कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर केला तर त्यांना शेतातील पिकांवर किती दिवसात कोणता रोग येणार, रोग आल्यावर कोणत औषध फवारायच, पिकांना पाणी कधी द्याच आदि माहिती मिळवीता येवु शकते आणी या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सुटतील अशी माहिती देवुन हे तंत्रज्ञान संदिप काळे यांनी उपलब्ध करुन द्यावे अशी विनंती केली. या शिवाय लहान पणाच्या आठवणींना सुध्दा उजाळा देवुन २१ नव्हेंबर ते २९ नव्हेंबर पर्यंत होणाऱ्या अग्रो व्हीजन प्रदर्शनीत जास्तीजास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे निमंत्रण सुध्दा त्यांनी यावेळ दिले.
शेतकऱ्यांच उत्पन्न एक लाख पर्यंत नेण्याचा उद्देश- सुमीत वानखेडे
आमदार सुमीत वानखेडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना, विधानसभा क्षेत्रातील १०० टक्के शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याचा आमचा उद्देश असल्याच सांगुन नवीन शेती पध्दतीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न एक लाखा पर्यंत कस नेता येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शेतीमधुन आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढू शकतो याचे ज्ञान शेतकऱ्याला जर मिळाले तर नक्कीच आर्थीक समृध्दी कडे त्यांची वाटचाल झाल्या शिवाय राहणार नाही अशी अपेक्षा सुध्दा वर्तवीली. विध्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यासाठी ए.पी.एम.सी. च्या माध्यमातुन विविध योजना राबवील्या जाणार आहे. याशिवाय थंड शितगृह असेल, सुतगीरणी प्रकल्प असेल याकरीता त्यांचे प्रयत्न सुरु आहे. या उपक्रमांना आमदार म्हणुन मी तसेच सरकार सुध्दा पुर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे असे सांगुन नव्हेंबर मध्ये होत असलेल्या अग्रो व्हीजन प्रदर्शनीला जास्तीजास्त शेतकरी नेण्याचे आश्वासन सुध्दा त्यांनी यावेळी दिले.
विरोधकांच्या अडथळ्याला न घाबरता ध्येय्य गाठणार – संदिप काळे
संदिप काळे यांनी यावेळी संस्थेची माहिती देतांना सांगीतले की, शेतकऱ्यांच हित पाहता आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन शित गृह उभारण्याचा निर्णय घेतला असल्याच सांगीतलं. याचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळणार असल्याची माहिती देवुन, या शिवाय शेती उपयोगी जेसीबी असेल ड्रोन्स असतील जे जे आधुनीक यंत्र असेल जे शेतकरी विकत घेवु शकत नाही अशी यंत्रे बाजार समिती विकत घेईल आणी अल्प दरात विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देईल. यामुळे शेतकऱ्यांसह संस्थाना सुध्दा याचा लाभ मिळणार असल्याची माहिती दिली. बंद अवस्थेत पोहचलेल्या सहकारी बँकेला आम्ही पाच लाखाचा धनादेश देवुन बँक सक्षमीकरण अभीयानाची सुरूवात केली आहे. याशिवाय आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले असुन सहकार क्षेत्र कस सक्षम होईल याकडे लक्ष केंद्रीत केल आहे. मात्र त्यात सुध्दा विरोधक खोडा घालतात अशी खंत व्याक्त करुन याला न जुमानता आम्ही घेतलेले निर्णय आणी ठरवीलेले ध्येय्य तुमच्या मदतीने पुर्ण करु असा निर्धार सुध्दा त्यांनी या वेळी व्यक्त केला.
शेतकरी, तज्ञ व प्रशिक्षकांचा केला सन्मान
यावेळी दिलीप खंडेलवाल, बाळ सोनटक्के, विलास महाजन आदि सहा शेतकऱ्यांना माती परिक्षण प्रमाण पत्र वितरीत केले. तर स्पर्धा परिक्षा तयारीचे तज्ञ मार्गदर्शक म्हणुन विशाल येलेकर व तुषार भांडेकर यांची नियुक्ती केली असुन क्रीडा प्रशिक्षक म्हणुन दिपक वनवे, विजय पवार, आशीष, अमोल नागपुरे, महेश वाघ, जाधव, प्रज्वल लोखंडे, दिपक पोकळे, आठवले यांचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना समितीचे उपाध्यक्ष प्रशांत वानखेडे यांनी मांडली. संचालन आशीष देशमुख यांनी केले तर आभार चेतन निस्ताने यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.