Maharashtraशैक्षणीक

*** कृषक इंग्लीश स्कुलच्या आयुष गौतम व नैतिक अर्जुन या विध्यार्थ्यांची *** इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद *** एक हजार ५०० विध्यार्थ्याचा होता सहभाग ***

            आर्वी,दि.१६:- सनशाईन सेल फाऊंडेशनच्यावतीने आयकेएस ज्ञान महोत्सवाच्या माध्यमातुन वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महात्सवात जिल्हृयातील विविध शाळेच्या एक हजार ५०० विध्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवीला यातील कृषक इंग्लीस स्कुलच्या आयुष गौतम व नैतिक अर्जुन या विध्यार्थ्यांच्या उपक्रमाची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद घेतली आहे.

सेवाग्राम येथील चरखा भवनात शनिवारी(ता.१३) व  रवीवारी (ता.१४) सेल अकॅडमीच्या वर्धा संचालीका पल्लवी पाटोदकर बोदिले यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या महोत्सवात जिल्ह्याच्या विविध भागातुन सहभागी झालेल्या एक हजार ५०० विध्यार्थ्यांनी. वैदिक गणित, आयुर्वेद व रसशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिष व कालमापन, प्राचीन कृषी जलसंवर्धन व पर्यावरण, धातुकर्म व रसायनशास्त्र, संगीत, नृत्य व सांस्कृतिक कला,वास्तुकला व वास्तुशास्त्र भाषा, व्याकरण व तत्ववादी, दैनंदिन जीवनातील नवकल्पना व प्राचीन साधने आदि विषयांवर तयार केलेली ६३५ अव्दीतीय अशी मॉडेल्स सादर केली होती. यातील कृषक इंग्लीश स्कुलच्या प्रदिप गौतम व नैतिक अर्जुन या विध्यार्थ्यांचे नाव इंडिया व आशीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविल्या गेले असल्याने त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हि मॉडेल्स पाहण्याकरीता पाच हजाराहुन अधिक लोकांनी भेटी दिल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व संशोधनवृत्तीला चालना देणारा व वर्धा जिल्ह्याचा लौकिक संपूर्ण देशभरात पोहचवणारा ठरला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button