*** जि.प.शाळेच्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्य देवुन केला मुलीचा वाढदिवस साजरा *** नेरी (मिर्झापुर) सरपंचाचा आदर्श उपक्रम ***

आर्वी,दि.११:- नेरी (मिर्झापुर) येथील उपक्रम शिल सरपंच बाळ सोनटक्के यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करुन एकुलत्या एक मुलीचा वाढदिवस साजरा करुन आदर्श उपक्रम राबवीला. विध्यार्थ्यांनी सुध्दा त्यांचे अभिनंदन केले.
सातत्याने नवनवीन उपक्रम राबवुन गावाला नावारुपास आणणाऱ्या सरपंच बाळ सोनटक्के यांनी आपल्या मैथीली नावाच्या एकुलत्या एक मुलीच्या वाढदिवसाला बडेजाव पणाला दुर सारत जि.प. शाळेत शिकत असलेल्या विध्यार्थ्यांसोबत साजरा करुन एक आदर्श पायंडा रचला आहे.
यावेळी विचार मांडतांना त्यांनी, जिच्या हाती पाळण्याची दोरी l तीच जगाला उद्धारी l ऐशी वर्णिली मातेची थोरवी l या काव्य पंक्तीचा उल्लेख करुन राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातुन दिलेल्या संदेशापासुन मला हि प्रेरणा मिळाली असुन गावाचे ऋृण फेडण्याचे माझे कर्तव्य असल्याची जाण ठेवुन हा उपक्रम राबवीण्याचा मी निर्णय घेतला आहे असे सांगीतले.
या कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापक मंगेश कोल्हे तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी सेविका प्रियंका काळपांडे यांनी केले तर, सहाय्यक शिक्षक विवेक कहारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गावातील पुरुष व महिला यांची लक्षणीय उपस्थीती होती.