Uncategorizedधार्मीक कार्यक्रम

***ईस्लाम धर्म संस्थापक हजर मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस उत्साहात साजरा***खासदार व हिंदुत्ववादी आमदारांनी मुस्लीम काळी टोपी घालुन दिल्या शुभेच्छा**** सामाजीक व धार्मीक एकतेच वातावरण झाले निर्माण***

आर्वी,दि.८:- ईस्लाम धर्म संस्थापक हजर मोहम्मद पैगंबर यांचा पंधराशेवा जन्म दिवस शुक्रवारी (ता.पाच) मिरवणुक काढुन मोठ्या उत्साहात साजर करण्यात आला. या मिरवणुकीत खासदार व हिंदुत्ववादी आमदार मुस्लीम गमझा व काळी टोपी घालुन तर, सर्वधर्मीय समाजसेवकांनी सहभागी होवुन शुभेच्छा दिल्या. यामुळे सामाजीक व धार्मीक एकतेचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळी नऊ वाजता गांधी चौकातुन निघालेल्या या मिरवणुकीत शहराच्या प्रत्येक मस्जीद मधुन आलेल्या मिरवणुका  व मुस्लीम समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुमारे तिन किलोमिटर लांबीच्या या मिरवणुकीत विविध धार्मीक प्रसंगाची आठवण करुन देणाऱ्या ट्रॅक्टर वर सजवीलेल्या प्रतिकृती, घोडा बग्गी, ॲटो, कार आदि सहभागी झाले होते तर, डिजेच्या धार्मीक गाण्यावर झेंडे फडकावुन आनंद व्यक्त करणाऱ्या युवकांनी यात चांगलाच रंग भरला होता.

अल्लाह हु अकबर, सरकार की आमदा, मरहब्बा व नाता शरीफ चे वाचन करीत गौरक्षण वार्ड, खडकपुरा, पद्मावती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड, लकडगंज, नुरी मोहम्मद मस्जीद होत सहकार मंगल कार्यालयात झंडा फडकवुन या मिरवणुकीचे समारोप झाले.

  या दरम्यान शिवाजी चौकात खासदार अमर काळे, आमदार सुमीत वानखेडे,  विधान परिषद सदस्य दादाराव केचे, प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळ जगताप, मनोज आगरकर यांनी तर लाकुड बाजारात शिवसेनेचे दशरथ जाधव यांनी मुस्लीम बांधवांची गळाभेट घेवुन शुभेच्छा दिल्या.  सामाजीक संघटनांनी व राजकीय पक्षाच्यावतीने ठिकठिकाणी पाणी, मिठाई, फळ, आईस्क्रीम आदिंची सोय करण्यात आली होती.

समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष हजरत मौलाना सलीम अशरफ हे होते तर, लहान मस्जीदचे हाफीज अख्लाक रजा यांनी कुराण पठण केले, औलीया मस्जीद च्या हाफीज शहनवाज रजा यांनी नातेपाक चे पठण केले, मंच संचालन मौलाना जहीर आलम यांनी केले. मौलाना जाहिद कादरी, मौलाना सलीम अशरफ, हाफिज अशरफ रज़ा, हाफिज अनवर रज़ा मौलाना नदीमुल कादरी रज़ा ,मौलाना शहज़ाद आलम तथा इंदरमारी दर्गा के गादीनशिन दानीश बावा कादरी आदि प्रमुख अतिथी होते. यावेळी उत्कृष्ट सजवीलेल्या झॉकीला प्रात्साहन पर पुरस्कार देण्यात आला तर, शहराची सजावट करणाऱ्या युवकांचा सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाचे संचालन शायर फारूक ज़िया यांनी करुन शायर समीर दिलकश यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता ईद मिलादुन्नबी कमेटी चे शहर अध्यक्ष शेख फिरोज़ मंसुरी, सचिव रेहान तौसीफ, शेख सादीक, मोहम्मद अशफाक, अबरार खान, शेख शाहेजाद, कंचु कुरैशी, साजीद पटेल, अज्जु कुरैशी, शेख चांद, सलीम सौदागर, शेख सोहेल, तौसीफ सौदागर, ज़ैद खान आदि नी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रम शांततेत पार पडावा याकरीता उपविभागीय अधिकारी चंद्रकांत धोटे व ठाणेदार सतीश डेहणकर यांनी मोठा बंदोबस्त लावला असला तरी ईद-मिलादुन्नबी व गणेश विसर्जन एका दिवसी आल्यामुळे पोलीसांना मोठी धावपळ करावी लागली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button