*** भाजप चा दावा खोटा, राजणी काँग्रेसचीच *** भाजपच्या मेळाव्यात विनवण्याकरुन नेले आणी बेमालुम पणे घेतला प्रवेश ***
*** खासदार अमर काळे यांच्या हस्ते घातले तुतारीचे दुप्पटे *** पिढी दर पिढी आम्ही काँग्रेसचेच *** ***

आर्वी,दि.२६:- राजणी गाव काँग्रेस मुक्त केल्याचा भाजपचा दाबा खोटा ठरला आहे. काही भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला सहकार मंगल कार्यालयात नुकत्याचा झालेल्या भाजप मेळाव्यात विनवण्याकरुन नेल आणी बेमालुम पणे आमदार सुमीत वानखेडे यांच्या बाजुला उभ करुन दुप्पटा टाकला व राजणी गाव काँग्रेस मुक्त झाल्याची बोंब ठोकली. राजणी काँग्रेसची होती, आहे, आणी राहणार असे ठामपणे राजणी वासीयांनी शुक्रवारी (ता.२६) येथे सांगीतल आहे.
येथील सहकार मंगल कार्यालयात गत गुरूवारी (ता.१८) आमदार सुमीत वानखेडे यांच्या अध्यक्षते मध्ये भाजप आर्वी तालुका विस्तृत कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीचे उदघाटन भाजपचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी केली. या बैठकी करीता मोठ्या संख्येने लोकांना जमा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर डोळा ठेवुन उमेदवारी मिळवीण्याच्या उद्देशाने आपल्या पाठीमागे कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा आहे हे दाखवीण्याची होडच भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये लागली. त्यांनी काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस याचा विचार न करता वाहणे भरभरुन लोकांना बैठक स्थळी आणले. त्या दिवशी गुरूवार असल्यामुळे बाजाराला येणारे लोक सुध्दा त्यात सहभागी झाली. यात राजणी येथील नागरिकांचा सुध्दा समावेश आहे. सभा संपल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी कट्टर काँग्रेसी असलेल्यांना सुध्दा आमदार सुमीत वानखेडे यांच्या बाजुला उभ करुन त्यांच्या गळ्यात दुप्पटे टाकले यात मतदार नसलेल्यां सतरा अठरा वर्षांच्या मुलांचा सुध्दा समावेश आहे. आणी राजणी गाव काँग्रेस मुक्त झाल्याची बोंब सोसल मिडीया व वृत्त पत्रांच्या माध्यमातुन ठोकली. यामुळे त्रस्त झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.२६) खासदार अमर काळे यांची भेट घेवुन त्यांना घडलेल्या घटनेची इतंभुत माहिती दिली.
खासदार अमर काळे यांच्या हस्ते घातले तुतारीचे दुप्पटे
फसवणुक झालेल्या लोकांनी शुक्रवारी (ता.२६) स्व्त:हुन खासदार अमर काळे यांची त्यांच्या निवास स्थानी जावुन भेट घेतली आणी आम्ही पुर्वी पासुनच तुमच्या सोबत आहो आणी राहु अशी कबुली दिली आणी त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे दुप्पटे गळ्यात घातले आणी निष्ठा कायम असल्याचे जाहिर केले. यात धनराज चव्हाण, नारायण चव्हाण, मोतीराम राठोड, कुंडलीक घोडाम, विनोद पवार, पाचघरे यांचा समावेश आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मुकेश कराळे, मोहन दुबे, सुरज चव्हाण, पुरुषोत्तम चव्हाण, नवलसिंग पवार, ताराचंद चंव्हाण, गोवर्धण चव्हाण, अरुण चव्हाण, हिरासिंग राठोड, कैलाश चव्हाण. दिलीप चव्हाण आदि गावकरी उपस्थीत होते.
पिढी दर पिढी आम्ही काँग्रेसचेच
काका तुले चालाच लागते, अरे कूठ आम्हाला नेवुन राहिला अस विचारल मात्र याच उत्तर न देता भाजप कार्यकर्त्याने आम्हाला दोन गाड्यात बसवल आणं सहकार मंगल कार्यालयात नेल. सभा झाली नंतर आम्हाले बोलावल साहेबाच्या बाजुले उभ केलं, फोटो काढले अण दुप्पटे टाकले. आमच गाव काँग्रेसच आहे आमच्या आई वडीला पासुन पिढी दर पिढी आम्ही काँग्रेसचेच आहो आणी राहणार असे धनराज चव्हाण यांनी ठामपणे सांगीतले.
माती चिखलात राहलो मात्र काँग्रेस सोडली नाही
भाजप वाल्याने विनवण्याकरुन आम्हाले दोन गाड्यामध्ये नेल आणी आमच्या गळ्यात साहेबाच्या हातान बेमालुम पणे दुप्पटे टाकले. आम्ही भाजपात प्रवेश घेतला नाही. माहित नसतांना हे सगळ झाल आम्ही आधी पासुन काँग्रेस मध्ये आहो माती चिखलात राहीलो मात्र काँग्रेस सोडली नाही असे नारायण चव्हाण, मोतीराम राठोड, कुंडलीक घोडाम यांनी सांगीतल.