आर्वीच्या सहकार क्षेत्रातील गैरप्रकार व घोटाळा उघड, संचालक गजानन निकम यांचा दावा
खरेदी विक्री संस्थेवरील आरोप***शेतकरी, सहकारी, जिनींग प्रेसींग फॅक्टरीचा भुखंड घोटाळा***कृषी उत्पन्न बाजार समितीची नियम बाह्यता***

आर्वी,दि.६:-येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी सहकारी जिनींग प्रेसींग फॅक्टरी व खरेदी विक्री संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार व घोटाळा झाल्याचा केलेला आरोप चौकशी समितीने २१ आगष्टला दिलेल्या अहवाला वरुन उघड झाल्याचा दावा संचालक गजानन निकम यांनी पत्रकार परिषदेत केला असुन मंत्र्यांनी संचालक मंडळावर कारवाई करुन विधान सभा अधिवेशनात दिलेले आश्वासन पुर्ण करावे अशी मागणी केली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन निकम यांनी गुरूवारी (ता.चार) येथील विश्राम गृहात पत्रकार परिषद आयोजीत केली होती यात विरुळ सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ कुंभारे, मळगण सोसायटीचे अध्यक्ष बोबड, शिरपुर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर टोपले आदि उपस्थीत होते.
संदिप काळे यांच्या अधिपत्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री सहकारी संस्था व शेतकरी सहकारी जिनींग प्रेसींग फॅक्टरी मध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार व गैरप्रकार झाल्याचा आरोप करुन सहकार खात्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याची दखल घेवुन सहकारी संस्थेचे वर्धा जिल्हा उप जिल्हा निबंधक यांनी दोन सदस्य समिती गठीत केली. या समितीचा अहवाल २९ आगष्टला प्राप्त झाला असुन त्या माध्यमातुन गैरप्रकार व कायद्याचे उल्लंघन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती गजानन निकम यांनी पत्रकार परिषदेत केली.
खरेदी विक्री संस्थेवरील आरोप
खरेदी विक्री संस्थेला लिजवर दिलेल्या नझुलच्या जागेवर आधी कृषक शिक्षण संस्थेने कॉलेज चालवीले. त्यानंतर कन्याशाळा चालवीली त्या जागेवरी इमारत पाडून त्यावर व्यापारी गाळे बांधण्याचा निर्णय संस्थेने घेवुन हे काम दोन कंपण्यांना भागीदारी तत्वावर विना परवाना ८७ लाख ८७ हजार ८७७ रुपयाला दिले. कंपनीने या पैकी पाच लाखाचे धनादेश संस्थेला दिले आणी ईमारत जमीन दोस्त केली. या मोबदल्यात भागीदारी कंपनीला तळ मजला व पहिल्या मजल्यावरील गाळे ते म्हणतील त्यांना भाडे पट्यावर करार नामा करुन देण्याची मुभा सुध्दा देण्यात आल्याचे अहवात नमुद आहे.
संस्थेच्या पदावर कार्यरत असतांना पदाधिकाऱ्याला कोणताही लाभ घेता येत नाही. तर, पदावर असलेल्या दुसऱ्या संस्थेकडून लाभ मिळवुन देता येत नाही. मात्र खरेदी विक्री संस्थेच्या सचीव पदावर कार्यरत असतांना या संस्थेची जागा अध्यक्षपदावर असलेल्या आर्वी नागरी सहकारी पत संस्थेला भाड्याने देवुन त्यांचेकडून सन २०२३-२४ पर्यंत एक हजार रुपये महिण्या प्रमाणे वर्षाचे १२ हजार रुपये वसुल केल्याचे समितीला आढळुन आल्याचे अहवालात नमुद आहे.
संस्थेची वर्धा मार्गावरील जागा कृषक इंग्लीश स्कुलला पाच हजार रुपये महिण्याने २८ वर्षा करीता, रोषण मंगल कार्यालयाला ३लाख६२ हजार रुपयाच्या वार्षीक भाडे पट्टीवर १५ वर्षा करीता, सहकार मंगल कार्यालयाला नऊ लाख रुपये वार्षीक भाड्या प्रमाणे १० वर्षाकरीता दिले आहे. तर, तुळजाई डेव्हल्पर्सला व एका कंपनीला डि मार्ट करीता जागा दिली असल्याचे अहवालात नमुद आहे
संस्थेचे भाग भांडवल ३ लाख ४९ हजार सहाशे रुपये आहे. या पेक्षा जास्त रक्कम संस्थेला इतरत्र गुंतवता येत नाही. मात्र संस्थेने ठराव करुन महालक्ष्मी सहकारी सुतगिरणी संस्थेचे ३५ लाख रुपयाचे भाग खरेदी करण्याचे ठरवीले आणी भाग भांडवली पेक्षा जास्त ११ लाख रुपयाचे भाग खरेदी सुध्दा केले असल्याचे अहवालात नमुद आहे
शेतकरी, सहकारी, जिनींग प्रेसींग फॅक्टरीचा भुखंड घोटाळा
जिनींग प्रेसींग फॅक्टरीची जागा आशिष अग्रवाल यांना प्रेस उध्योग स्थापण्या करीता ५० हजार रुपये वार्षीक भाड्याने व रेचे बसविण्याकरीता ८५ हजार रुपये वार्षीक भाड्याने २०३४ पर्यंत, आशिर्वाद कॉटन कॉर्पोरेशन ला गोडाऊनसह २०३४ पर्यंत एक लाख ८० हजार रुपये वार्षीक भाड्याने यात तिन वर्षा नंतर ३ टक्के व १० टक्के वाढीची तरतुद आहे. साईनाथ इंटरप्राईजेस ला ३ लाख २५ हजार रुपये वार्षीक भाड्याने २०३२ पर्यंत यात सुध्दा १० टक्के भाडे वाढीची तरतुद आहे. सिध्दी विनायक कॉटस्पिन मुंबई यांना २ लाख ६७ हजार ५७५ वार्षीक भाड्याने सन २०३४ पर्यंत यात सुध्दा भाडे वाढीची तरतुद करण्यात आली आहे. राहुल अग्रवाल यांना संस्थेच्या मालकीचा टिन शेड (सहकार भवन) २०४० पर्यंत देण्यात आले आहे मात्र याचा भाडे करारनाम केलेला नाही. ऍकॉड इंडस्ट्रिज प्रा. लि. काटोल यांना संस्थेची खाली जागा बांधण्याकरीता व इतर उध्योग करण्याकरीता २ लाख १७ हजार ६०२ वार्षीक भाड्याने दिली असल्याचे चौकशी समितीने नमुद केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची नियम बाह्यता
सन २०२३-२४ व सन २०२४-२५ मध्ये कापस खरेदीची व्यापार निहाय माहिती व व्यापाऱ्यांनी सन २०२३-२४ व सन २०२४-२५ मध्ये खरेदी केलेल्या कापसाच्या माहिती मध्ये समितीला फरक दिसुन आला आहे. तर भाडे धारकाने टिनपत्र्याचे गोडाऊन बांधकाम करतांना समितीने १२-(१) प्रमाणे परवानगी घेतली नसल्याचे अहवालात सांगीतले आहे.
शेतकरी सहकारी जिनींग प्रेसींग फॅक्टरी आणी खरेदी विक्री संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम २० (अ) चे उल्लंघन केल्याचे अहवालात नमुद केलेअसुन कृषी उत्पन्न बाजार समितीने सुध्दा नियमाचे व उपविधीचे उल्लंघन करुन सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचे चौकशी समितीच्या अहवालावरुन उघड झाले असल्याचे गजानन निकम यांनी सांगुन मंत्र्यांनी व सहकार खात्याने दोषींवर कारवाई करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन केली आहे.