वर्धा जिल्हा आंतरमहाविध्यालयीन मोदक स्पर्धा संपन्न **** ११ महाविध्यालय, तिन कनीष्ठ महाविध्यालयातील १२७ विध्यार्थीनींचा सहभाग

आर्वी,दि.३१:- येथील कला, वाणीज्य व विज्ञान महावीध्यालयाच्या गृह अर्थशास्त्र विभागाने गणेश उत्सवाच्या पर्श्वभुमीवर आयोजीत केलेली वर्धा जिल्हा आंतर महावीध्यालयीन मोदक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील ११ महविध्यालय आणी तिन कनिष्ठ महाविध्यालयातील १२७ विध्यार्थीनींनी सहभाग नोंदवीला.
स्थानीक कला, वाणीज्य व विज्ञान महाविध्यालयात शनिवारी (ता.३०) झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के यांनी केले. यावेळी कृषक कन्या विध्यालयाच्या मुख्याध्यापीका सौ. अनघा कदम, डॉ. सुषमा बोंडे, सौ. वैशाली सोनटक्के, सौ. मानसी होरे, सौ. कांचन भुयार ह्या प्रामुख्याने उपस्थीत होत्या.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविध्यालयाती आणी कनिष्ठ महाविध्यालयातील १२७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवीला. यापैकी सेलु येथील यशवंत महाविध्यालयाच्या कु. पुजा डोंगरे हिने एक हजार रुपयाचे प्रथम पारितोषीक पटकावीला, आर्वीच्या कला, वाणीज्य व विज्ञान महाविध्यालयाच्या कु. शुभांगी दुधकवरे हिने सातशे रुपयाचे दुसरे तर, महिला महाविध्यालयातील कु. प्राची फाले हिने पाचशे रुपयाचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावीले. तर सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. स्पर्धकांनी मोदक घरुनच बनवुन आणले होते.
स्पर्धेच्या माध्यमातुन विध्यार्थीनीनी महाराष्ट्रातील पाक कलेची आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करावा या हेतुन या स्पर्धेचे आयोजन गृह अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. मोहीणी मेश्राम, डॉ. ज्योती देशमुख, प्रा. योगीता खेकाळे, प्रा. अमर भोगे, प्रा. हर्षिता त्रिवेदी यांनी केले होते.
स्पर्धेच्या यशस्वीत्तेकरीता महाविध्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापीका, कर्मचारी व विघ्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.