सिध्देश्र्वर धाम मंदिरच्या भावीक भक्तांनी रुक्मीणीचे माहेर तिर्थक्षेत्र कौंडण्यपुर येथुन काढली पायदळ जल कावड यात्रा

आर्वी,दि.५ :- येथील रेल्वे स्टेशन वार्डातील सिध्देश्र्वर धाम मंदिरातील भावीक भक्तांनी सोमवारी (ता.चार) रुक्मीणीचे माहेर तिर्थक्षेत्र कौंडण्यपुर येथील वर्धा नदीमधील पवीत्र जल कुंभात भरुन कावड यात्रा काढली. यात मोठ्या प्रमाणात भावीक भक्तांनी सहभाग नोंदवीला होता.
सध्या देशात श्रावण मासाचे औचीत्य साधुन भगवान शंकर शंभोला प्रसन्न करण्याकरीता देशभरात कवाड यात्रेचे आयोजन केल्या जात आहे. यात तरुणांचा जास्त सहभाग दिसुन येतो. श्रावण मासातील व्दीतीय सोमवाराचे औचीत्य साधुन येथील रेल्वे स्टेशन वार्डात असलेल्या सिध्देश्र्वर धाम मंदिरातील स्त्री-पुरूष भावीक भक्तांनी सुध्दा रुक्मीचे माहेर असलेल्या पवीत्र धाम कौंडण्यपुर येथील वर्धा नदीतील जल, कुंभात भरुन पायदळ कावड यात्रा काढली. या पवीत्र जलाने येथील शितला माता मंदिर, हनुमान मंदीर, व सिध्देश्र्वर धाम मंदिरात अभिषेक केला. यावेळी जय भोलेच्या नाऱ्यांनी आसमंत दणाणुन निघाला.
या कावड यात्रेचे आयोजन सनी गौतम, सतीस मुराई, चेतन दाहीर, अनिल चव्हाण, शुभम गिरी, प्रफुल गिरी, शुभम दुबे, सोनु दाहीर,आकाश चव्हाण, रवि चव्हाण, विजय गिरी, सुधीर श्रीवास, आनंद श्रीवास्, राजु कुदरे, पप्पु चव्हाण, श्रीवास, सोनु दाहीर, सचीन नेताम, चिंटू चव्हाण यांनी केले होते. तर, पप्पू शुक्ला, कैलाश राऊत, दादू घोडवे, आशिष मुराई, अंकुश मुराई, नितीन राऊत, विकी भट्ट, किशन रोहनकर याशवाय मोठ्या प्रमाणात पुरूष व महिला सहभागी झाले होते.