…. शिक्षणा सोबतच निसर्गाचे संरक्षण करणे गरजेचे- अनुराग जैन
आदर्श एकता सामाजीक संघटनेच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन

आर्वी,दि.२९:- मानवाला जिवनात प्रगती करायची असेल तर, शिक्षणाची जोड लागतेच सोबतच वातावरणातील प्रदुर्शनावर मात करायची असेल तर निसर्गाच्या संरक्षाणाची नितांत गरज आहे असे वर्धा पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी येथे सांगीतले.
बुधवारी (ता.२७) ते शांतता समितीच्या बैठकी करीता येथे आले होते यावेळी आदर्श एकता सामाजीक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम कुंभारे यांनी त्यांना वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याची विनंती केली होती. ती मान्य करुन येथील त्रिशरण बुध्द विहार, शितला माता मंदिर परिसरात त्यांनी वृक्षाचे रोपण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करुन उपस्थितांना मार्गदर्शन सुध्दा केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले, ठाणेदार सतीश डेहणकर, आयोजक गौतम कुंभारे, खुपीया मिलिंद पाईकराव, परवेज खान, पोलीस कमांडो,पोलीस, चंदा डोंगरे, चंदा सरोदे, संगीता वानखडे, जय सरोदे, मेघा सरोदे, लता थुल, शोभा टेकाम, रंजना माहुरे, पूजा कोडापे, नाखले, शोभा टेकाम, सीमा गोंडाणे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निसर्गाचे संतुलन कायम ठेवण्याकरीता आदर्श एकता सामाजीक संघटना गत अनेक वर्षा पासुन सातत्याने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. त्याचा एक भाग म्हणुन या पावसाळ्यात सुध्दा त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी यात महिलांनी सुध्दा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीला आहे.