मर रोगांच्या प्रादुर्भावामूळे सोयाबीन पीक होत आहे नेस्तनाबुत शेतकरी येणार अडचणीत कृषी विभागाला तातडीने लक्ष घालण्याची गरज
सोयबीन पेऱ्याचे सर्व्हे करुन तातडीने मदत द्यावी - सामाजीक कार्यकर्ते सुधीर होले

प्रतिनिधी आष्टी,(शहिद):- सोयाबीन पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिक नेस्तनाबुत होत असल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी नैसर्गिक संकट उभे ठाकल असल्याने तेअडचणीत येत आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्याकरीता कृषी विभागाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
नगदी पिक म्हणुन कापसाकडे शेतकऱ्यांचा जास्त कल होता. मात्र दिवसेंदिवसे या वर होणारा वाढता खर्च आणी उत्पादन घरी आल्यावर पडणारे बाजार भाव यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी याकडे पाठ वळवीली आहे. याला पर्याय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीनला आपली पसंती दिली आहे. परिणामी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र या नगदी पिकावर सुध्दा मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
हा रोग कशामुळे पिकावर येतो याच नेमक कारण शेतकऱ्यांना कळल नसल्याने यावर काय उपाय योजना कराव हे कळाला मार्ग नाही. अतिरिक्त रासायनीक खतांचा वापर केल्याने शेत जमीन तर खराब झाली नाही ना? येला मोज्याक, खोळकिळा, चारकोल रॉल की बोगस बियाने याला कारणीभुत तर नाही ना? अनेक प्रश्न, शंका कुशंका शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेल्या आहेत. कृषी विभाग सुध्दा कुठल्याही प्रकारची माहिती पुरवत नाही. परिणामी यावर काय उपाय योजना करावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन पिकावरच भिस्त आहे. या मर रोगामुळे हातच पिक गेल तर शेतकरी आर्थीक अडचणीत येणार असुन त्याचेवर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. शासनाने व कृषी विभागाने याकडे तातडीने लक्ष देवुन मर रोगावर नियंत्रण मिळवीण्याकरीता व शेतकऱ्यांना अडचणीतुन सोडवीण्याकरीता तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी आहे.
सोयबीन पेऱ्याचे सर्व्हे करुन तातडीने मदत द्यावी
सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची भिस्त आहे हेही पीक हातून निघून गेले तर शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय मार्ग नाही कारण चोफेर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत कोण करणार सरकारने कर्ज माफीचे आश्वासन देऊन सुद्धा कर्ज माफ केले नाही उसनं वारीने पैसे आणून शेतकऱ्यानी कसेबसे पीक उभे केले पण त्यावरही निसर्गाची वक्रदृष्ट्री पडली त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. कृषी विभागने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थीक मदत द्यावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते सुधीर होले यांची आहे.