लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी वेशभुषा धारी विध्यार्थ्यांनी केलेली भाषणे ठरली आकर्षण

आर्वी,दि.२:- येथील पि एम श्री गांधी विध्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवारी (ता.एक) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वेशभुषा धारी विध्यार्थ्यांनी केली भाषणे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा शाळेतील पाचवी ते बारावी वर्गाच्या विध्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या जयंती दिना निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विश्र्वेश्र्वर पायले हे होते तर, पर्यवेक्षीका ज्योती अजमीरे, प्रा. नितीन बोडखे, जेष्ठ शिक्षक संजय किटे हे प्रमुख अतिथी होते.
यावेळी लोकमान्य टिळक यांची वेशभुषा धारण करुन आलेल्या अंशु भांगे या विध्यार्थ्यांने व वेशभुषा धारी विध्यार्थीनीने लोकमान्य टिळक व लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या जिवनावर प्रकाश टाकला तर, इतर अनेक विध्यार्थ्यांनी सुध्दा आपले विचार मांडले.
या कार्यक्राची प्रस्तावना जेष्ठ शिक्षक संजय किटे यांनी मांडली, संचालन नवव्या वर्गातील विध्यार्थीनी सृष्टी काळबांडे व श्रावणी शेंडे यांनी केले तर आभार कु. आरुषी शाहु हिने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता विध्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.