दहा चक्का मालवाहु वाहनाची धडक बसुन दुचाकी चालक जागीच ठार वर्धा येथील डाक कार्यालयात होता कार्यरत, लातुर (अहमेपूर) येथील रहिवासी

आर्वी,दि.३०:- वर्धेकडे जात असलेल्या मालवाहुन वाहनाची जोरदार धडक बसल्याने दुचाकी चालक जागीच ठार झाला. वर्धा मार्गावरील वाढोणा- पिंपळखुटा गावांच्या मध्यरस्त्यावर शनिवारी (ता.३०) सकाळी १० वाजताचे सुमारास ही भिषण दुर्घटना घडली असुन मृतक वर्धा येथील मुख्य डाक कार्यालयात कार्यरत असल्याचे कळते.
ज्ञानेश्वर माधवरराव जायभाये (३७ वर्ष) असे मृतकाचे नाव असुन तोडगा रोड, सुनेगाव (सेंद्री), गंगाहीप्पामार्ग, लातुर, अहमेपुर येथील तो रहिवासी आहे. भारतीय डाक विभागाच्या वर्धा मुख्यालयात मार्केटींग एक्झीकेटीव्ह म्हणुन तो कार्यरत आहे. शनीवारी (ता.३०) सकाळी एमएच ३२ एआर १९८८ क्रमांकाच्या हुंडा कंपनीच्या जेनीकार्न या दुचाकीने तो कार्यालयीन कामाकरीता वर्धेवरुन आर्वीला येत होता. पिपंळखुटा ओलांडल्यानंतर काही अंतर पार करताच आर्वीकडून वर्धेकडे जात असलेल्या एमएच २८आर ८७७९ क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या १० चक्का मालवाहु वाहनाने त्याला समोरासमोर धडक दिली. यात ज्ञानेश्वर दुचाकीवरुन रस्त्यावर फेकल्याजावुन त्याच्या डोक्याला जबर मार लागला यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवन त्याचा जागीच मृत्यु झाला तर, त्याची दुचाकी चक्क्याच्या मागील चाकात येवुन चकणाचुर झाली. तर, चालकाने अपघात होताच घटनास्थळावरुन पलायन केल्याची चर्चा आहे.
अपघाताची माहिती मिळताच सामाजीक कार्यकर्ते रामु राठी यांनी तातडीने रुग्णवाहीका पाठवुन कार्यकत्यांना सुध्दा मदतीकरीता घटनास्थळी पाठवीले तर दुसरीकडे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले, ठाणेदार सतीश डेहणकर, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश वाघाडे, विनोद मस्के, गणेश सातपुते, बालाजी मस्के आदिंनी तातडीने घटनास्थळ गाठुन तपास सुरू केला आहे.