आमदार दादाराव केचे यांचा आनंददायी उप्रक्रम देवाभाऊ दहीहंडी व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन होणार लाखो रुपयाच्या बक्षीसाचा वर्षाव, तब्बल १७ नामवंत चमु होणार सहभागी

आर्वी,दि.१८:- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा विधान परिषद सदस्य आमदार दादाराव केचे यांनी गोकुळ अष्टमीनिमीत्त आनंदायी उपक्रमाच्या माध्यमातुन “देवाभाऊ दहीहंडी व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथील गांधी चौकात बुधवारी (ता.२०) आयोजीत या कार्यक्रमात राज्यातील १८नामवंत चमु सहभागी होणार असुन त्यांचेवर लाखो रुपयाच्या बक्षीसांचा वर्षाव करण्यात येणार आहे या शिवाय सांस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातुन मनोरंजनाची सुध्दा सोय केली आहे.
गत अनेक वर्षा पासुनची परंपरा खंडीत न होवु देता विधान परिषद सदस्य आमदार दादाराव केचे यांनी गोकुळ अष्टमी निमीत्त आयोजीत केलेल्या “देवाभाऊ दहीहंडी” स्पर्धेकरीता १ लाख ५१ हजार एक रुपयाचे प्रथम तर, ७१ हजार एकशेएक रुपयाचे दुसरे बक्षीस घोषीत केले आहे. या शिवाय सहभागी पथकांना प्रोत्साहन पर बक्षीस व शिल्ड सुध्दा दिल्या जाणार आहे.
या स्पर्धेत रामकृष्ण मंडळ, तारासाहेब बगीच्या राजापेठ अमरावती, ब्रदर्स ग्रुप अंबापेठ अमरावती, भोलेश्र्वर दहीहांडी ग्रुप नागपुर, जय महाकाली दहीहंडी ग्रुप नागपुर, जय श्रीराम दहीहांडी ग्रुप नागपुर, शिव तांडव दहीहांडी ग्रुप शिरसगाव, महाकाली दहीहांडी ग्रुप शिरसगाव, वॉरिअर्स दहीहांडी ग्रुप शिरसगाव, जय भोले दहीहांडी ग्रुप शिरसगाव, कालभैरव दहीहांडी गुप शिरसगाव, विर भगतसिंग दहीहांडी ग्रुप शिरसगाव, फ्रेंडस दहीहांडी ग्रुप धामणगाव, छत्रपती गोविंद पथक अमरावती, प्रभु श्रीराम दहीहांडी ग्रुप ब्राम्हणवाडा, याशिवाय धारणी, बैतुल, छिंदवाडा, धारणी (बऱ्हाणपुर),