Maharashtraसार्वजनीक माहिती

वर्धा जिल्ह्यात पहिलीच घटना **** आर्वीत आढळला दुर्मीळ “फोर्स्टन मांजऱ्या साप”

“मांजऱ्या साप” म्हणजे काय?

   आर्वी,दि.१७:- शास्त्रीय दृष्टया महत्वपुर्ण समजल्या जाणारा अर्ध विषारी “फोर्स्टन मांजऱ्या साप” शहरात प्रथमच आढळुन आला असून प्राणीमित्र डॉ. मनिष ठाकरे यांनी त्याला मोठ्या शिताफीने जेरेबंद करुन सुरक्षीत पणे वन क्षेत्र परिसरात नेवुन सोडले. मात्र अत्यंत दुर्मीळ असलेला हा साप वर्धा जिल्ह्यात प्रथम आढळला असल्याने प्राणी मित्रांना आनंदाचा क्षण अनुभवता आला.

गुरूवारी (ता.१७) अशोक खोडे यांना त्यांच्या राहत्या घरात साप आढळुन आला. त्यांनी घाबरुन न जाता याची माहिती सर्प मित्र व प्राणी संवर्धन कार्यकर्ते डॉ. मनीष ठाकरे यांना दिली. त्यांनी वेळ न दौडता खोडे यांचे घर गाठले. सुरक्षेच्या उपायासह अत्यंत शिताफीने त्यांनी सापाला जिवंत पकडले. त्याची ओळख करुन घेतली आणी लगतच्या वनक्षेत्र परिसरात सुरक्षीत पणे नेवुन सोडले. त्यांना प्राणीमित्र गौरव ठाकुर, शुभम जगताप, संतोष पडोळे, आनंद काळे, साहिल ठाकरे, कार्तीक कातोडे, नयन थिगळे आदिंनी मदत केली.

“मांजऱ्या साप” म्हणजे काय?

          या सापाचे शास्त्रीय नाव Boiga forsteni  असुन हा अर्धविषारी सापाच्या वर्गात मोडल्या जातो. मानवाकरीता प्राणघातक नसलेला हा साप मुख्यत: झाडांवर राहत असुन रात्री सक्रीय होतो. लहान सरीसृप, पक्ष्यांच्या अंडी व चिवट प्राण्यावर जगणारा हा साप भारताच्या काहीच भागात आढळतो. याची प्रथमच वर्धा जिल्ह्यात मिळाल्याची नोंद असावी. असे डॉ. मनिष ठाकरे यांनी माहिती देतांना सांगुन परिसरातील लोकांनी घाबरुन न जाता योग्य माहिती आणी मार्गदर्शन घेतल्याने हा साप सुरक्षीत पणे निसर्गात परतला याचा मला आनंद झाल्याचे सांगीतले.

         

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button