सार्वजनीक आरोग्य विभाग वर्धा व मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातुन शासनाच्यावतीने रवीवारी (ता.२७) मोतिबिंदु व आरोग्य शिबीराचे आयोजन
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणी इंडियन मेडिकल असोशिएशनचे तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार

आर्वी,दि.२६:- “एक पाऊल मोतिबिंदू विरहित आर्वी” हि संकल्पना घेवुन वर्धा जिल्हा सार्वजनीक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातुन येथील सहकार मंगल कार्यालयात रवीवारी (ता.२७) मोतीबिंदू व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराचे उद्घाटन वर्धा जिल्ह्याची पालक मंत्री तथा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार असुन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार अमर काळे, विधान परिषद सदस्य दादाराव केचे, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार, देवळीचे आमदार राजेश बकाने, आर्वीचे आमदार सुमीत वानखेडे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असुन वर्धा जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी., वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राला मोतिबिंदु मुक्त राज्य करण्याचा संकल्प सरकारने केला असुन त्याचाच हा एक भाग आहे. याशिबीरात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणी इंडियन मेडिकल असोशिएशनचे तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहे. परिसरातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेवुन मोतिबिंदु विरहित आर्वी करण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन सामान्य रुग्णालयाचे वर्धा जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुमंत वाघ व वर्धा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी केले आहे. करणार