प्रकरण वर्धा नदीच्या रेती चोरीचे *** आमदार दादाराव केचे यांचा पावसाळी अधिवेशनातील प्रश्नाचा परिणाम **** रेती माफीया सुटले आणी लहान कर्मचारी ***अडकले
निलंबाची कारवाई सुरू, प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार,***रेती माफीयांना अभय कुणामुळे*** आलेल उत्तर सभागृहाची दिशाभुल करणार असल्याचा आरोप***

आर्वी,दि.२:- वर्धा नदी मधील रेती चोरी करणाऱ्या माफीयांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरीता आमदार दादाराव केचे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता मात्र याचा परिणाम उलटाच झाला. मोठे अधिकारी व रेती माफीया सुटले आणी पटवारी व कोतवालांवर कारवाईचा बडगा उगारल्या गेला. यामुळे उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.
राजकीय नेत्याच्या मिळालेला आशिर्वादाचा लाभ उचलत त्यांच्या सोबत जवळीक साधणाऱ्या माफीयांनी मोठ्या प्रमाणात खुलेआम रेती चोरी सुरू केली. नदी मधील रेती उपसाकरण्याकरीता डोंग्यावर यंत्र लावले. नदी काठावरील याचे मोठ मोठे ढिगारे लावण्यात आले. खेलेआम अवैध्यरित्या याची विक्री सुरू केली. काही घरकुल धारकांनी याचे तक्रार आमदार दादाराव केचे यांच्याकडे केली. त्यांनी भर उन्हात नदी काठावर जावुन रेतीचे ढिगारे पकडून दिले. रेती माफीयांची नावे सुध्दा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांच्या पुढे उजागर केली. वृत्तपत्रात सुध्दा प्रसिध्द झाली मात्र अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन कारवाई थंड्याबस्त्यात पडली.
यामुळे संतप्त झालेल्या आमदार दादाराव केचे यांनी रेती माफीयांवर व त्याला अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या अपेक्षेने पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला मात्र झाल भलत राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी याला उत्तर देतांना पटवारी व कोतवालावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे सांगीतले आणी प्रश्न निकाली काढण्यात आला.
निलंबाची कारवाई सुरू, प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार
राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाप्रमाणे रेती चोरी प्रकरणी देऊरवाडा ग्राम महसुल अधिकारी शुभांगी डेहनकर व वाठोडा मंडळ अधिकारी किशोर चौधरी यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असुन प्रकरण जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे पाठवीण्यात येईल अशी माहिती तहसीलदार हरिष काळे यांनी दिली आहे.
रेती माफीयांना अभय कुणामुळे
शेतकऱ्याच्या शेतात मोठमोठाली ढिगारे लागली. बसण्याकरीता सोफा आला. जेवणावळी उठल्या. रेती उपसाकरण्याकरीता डोंग्याचा व मशीनचा वापर झाला. सहा चक्का, दहा चक्याने हजारे ब्रास रेतीची वाहतुक झाली. शेतकऱ्याने याची तक्रार सुध्दा केली. प्रसिध्दी माध्यमांनी नावे सुध्दा उजागर केली तरी गुन्हा मात्र अज्ञात चोरट्या विरुध्द दाखल झाला. मात्र खुलेआम रेतीची चोरी करणाऱ्या माफीयांचा शोध पोलीस घेवु शकले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात असुन रेती माफीयांना अभय कुणामुळे मिळाला याचीच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
उत्तर सभागृहाची दिशाभुल करणार आमदार केचे यांचा आरोप
महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या उत्तराने आमदार दादाराव केचे हे समाधानी झालेले नाही. आलेल उत्तर हे सभागृहाची दिशाभुल करणार असुन अधिकाऱ्यांच्या माध्यमातुन बनवाबनवी केल्याचा त्यांनी सभागृहात आरोप लावला आहे. रेती माफीयांचा शोध घेवुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी त्यांची अपेक्षा होती मात्र झाल भलतच माफीया सुटले आणी छोट्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेल्याची खंत यातुन दिसुन येत आहे.