पहलगाम हल्ल्यातील ५ दहशतवादी कुठे गेले ? लोकसभा अधिवेशनातुन खासदार अमर काळे यांचा सरकारला रोकठोक प्रश्न

आर्वी,दि.२९:- वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाव हल्ल्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होऊन पहलगाम हल्ल्यातील पाच दहशतवादी कुठे गेले? असा थेट प्रश्न विचारुन सरकारच्या भुमीकेवर हल्लाबोल केला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा खासदार अमर काळे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या चर्चे दरम्यान विरोधी पक्षाची बाजु मांडली. याची सुरूवातच त्यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करुन केली. यावेळी त्यांनी सभागृहाचे लक्ष एका महत्त्वपूर्ण पण दुर्लक्षित मुद्द्याकडे वेधले. सैय्यद आदिल हुसेन शहा या स्थानिक गाईडने पर्यटकांचे प्राण वाचवताना स्वतःचा जीव दिला. याचा उल्लेख करताना त्यांनी त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा केला आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करुन त्यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक सुध्दा केले.
देशाला हादरुन ठेवणारा दहशतवादी हल्ला झाला मात्र चर्चे दरम्यान त्याचे गांभीर्याने जाणवले नाही अशी खंत व्यक्त केली. पुढे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांना राजकीय रंग देणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगुन भाजपचा “राष्ट्र प्रथम” हा नारा असल्याच जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्यानुसार कृती होणेही अपेक्षित असते. सरकार कोणाचेही असो, चुका होतातच. मात्र त्या चुका सुधारण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहीजे अशी अपेक्षा वर्तवीली. २६/११ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान अजमल कसाबला जिवंत पकडून भारताने संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचे दहशतवादाशी असलेले संबंध उघड केल्याची आठवण यावेळी करुन दिली. आणी हे सत्य स्वीकारण्याची जबाबदारी सर्वच पक्षांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा वर्तवीली. तिन महिने उलटुन सुध्दा पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पकडल्या गेले नाही हे सरकारचे मोठे अपयश आहे असा आरोप सुध्दा लावला.
कारगिल युद्धात जम्मू आणि काश्मीरमधील गुज्जर आणि भाकरवाल समाजाने केलेल्या योगदानाची आठवण करुन देत त्यांनी, कारगिल युद्धात महत्त्वाची माहिती देणाऱ्या या समाजाने यंदा माहिती का दिली नाही? आणि दिली नसेल तर हे समुदाय सरकारपासून का दूर गेले? असे प्रश्न उपस्थित करुन या घटनेची तुलना १८७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाशी केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या दबावाला न जुमानता १३ दिवसांचे युद्ध लढवले आणि १६ डिसेंबर १९७१ ला पाकीस्थानचा दुकडा पाडुन बांगलादेशची निर्मिती केली. एवढच नाही तर पाकिस्तानचे ९४ हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती याची आठवण करुन दिली आणी आज भारताचे नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अशाच प्रकारच्या निर्धाराची अपेक्षा करत असल्याचे लक्षात आणुन दिले.
२०१४ पासुन या देशात भाजपाची सत्ता असुन पंतप्रधानांनी ९ वेळा, अमेरिका, पाच वेळा चीन, आठ वेळा जपान, ५ वेळा नेपाळ, १ वेळा ऑस्ट्रेलीया, १५ ते २० वेळा युरोपीयन देशाचे दौरे केले. यामुळे देशाच्या परराष्ट्रीय धोरणाला काय मिळाले? असा प्रश्न उपस्थीत केला. पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष पाकिस्तानच्या लष्करी प्रमुखाला जेवणासाठी आमंत्रित करतात, ही गोष्ट अत्यंत वेदनादायक असल्याचे सांगुन चीनच्या पंतप्रधानांशी अनेकदा भेटी झाल्यानंतरही चीन-पाकिस्तान संबंध ‘लोखंडासारखे मजबूत’ असल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीर करतात. ऐवढेच नाही तर आयएमएफ, एडीबी आणी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातुन ४४ अब्ज डॉलर्सची मदत त्यांना मिळते याला काय म्हणायचं? असे अनेक प्रश्न उपस्थित करुन, हा भारताच्या पराष्ट्र धोरणाचा पराभव असुन याच उत्तर पंतप्रधानांनी स्वत: या देशाला द्याव अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी चर्चे दरम्यान विरोधी पक्षाच्या मांडलेल्या रोकठोक मुद्याची जोरदार चर्चा होत आहे.