नामदेव महाराज सेवा मंडळ, शिंपी समाजाच्यावतीने ****आर्वीत, संतशिरोमणी नामदेव महाराज सजीवन समाधी सोहळा संपन्न****
आमदार सुमीत वानखेडे यांनी केला गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार तर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सौ. मयुराताई काळे यांनी केले पालखीचे पुजन

आर्वी,दि.२६:- संत शिरोमणी नामदेव महाराज सेवा मंडळ शिंपी समाज आर्वी, आष्टी कारंजाच्यावतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७५ वा दोन दिवशीय सजीवन समाधी सोहळा स्थानीक पारसे भवन मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सोमवारी (ता.२१) विवेक जुमडे व सौ. प्रिया जुमडे यांच्या हस्ते संत शिरोमनी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व कलश स्थापन करुन या सोहळ्याला सुरूवात झाली. महिला मंडळाच्यावतीने दुपारी रांगोळी, संगीत खुर्ची आदि स्पर्धा पार पडल्या त्यानंतर महिला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
तर, दुसरे दिवशी मंगळवारी (ता.२२) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सौ. मयुराताई काळे यांच्या हस्ते पालखीचे पुजन करुन शहराच्या मुख्य मार्गाने मिरवणुक काढण्यात आली. या नंतर दुपारी ह.भ.प. रमेश पंत आखरे महाराज आणी संचच्या वतीने संगीतमय किर्तनाच्या माध्यमातुन श्री. सतं नामदेव महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. तर, आमदार सुमीत वानखेडे यांच्याहस्ते दहावी व बारावीच्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवीका सारीका लोखंडे तथा मान्यवर प्रामुख्याने उपस्थीत होते.
या कार्यक्रमाची सांगता मनोज डवरे व सहकारी यांच्या संगीताच्या कार्यक्रमाने झाली. तर, यानंतर शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
कार्यक्रमाची प्रस्तावना आशिष आपकाजे यांनी मांडली, संचालन सौ. किरण आशिष आपकाजे व सौ. प्राजाक्ता वैभव पिहूल यांनी केले, आभार पंकज भगत यांनी मानले. तर, मंडळाचे माजी अध्यक्ष एकनाथराव इंगळे व माजी सचिव किशोर वाघमारे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता, मंडळाचे अध्यक्ष राजेश वाघमारे ,उपाध्यक्ष अजिंक्य बेलगे, सचिव आशिष आपकाजे, कोषाध्यक्ष निलेश पिहूल, प्रसिद्धी प्रमुख अंकुश जाऊरकर, पंकज भगत, सदस्य चंदनराव पिहूल, गजानन इंगळे, सुनील माळोदे, दिनेश भगत, प्रसाद धारस्कर, अनिल डवरे, हर्षल आपकाजे, आशिष तल्हार, रवी जाऊरकर, आयुष आपकाजे, अमोल राऊत, आदित्य पिहूल, अविनाश सलामे तसेच विश्वस्त मंडळ, शिंपी महिला मंडळ, युवक मंडळ ,सल्लागार समिती, तथा शिंपी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.