दही हंडीची परंपरा कायम ठेवत नेरी मिर्झापर येथे नागपंचमी उत्सव साजरा सर्पमित्राचा केला सन्मान, पर्यावरणाचा दिला संदेश

आर्वी,दि.२९ :- अनेक वर्षाची परंपरा जपत नेरी (मिर्झापुर) पनर्वसन वसाहतीमध्ये दही हंडीचा कार्यक्रम आयोजीत करुन नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्पमित्र मनीष ठाकरे याचा सत्कार करण्यात आला तर, माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातुन पर्यावरणाचा संदेश दिला. सोपीनाथ महाराज मंदिरात बुधवारी (ता.२९) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नेरी (मिर्झापुर) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक भट्टड, प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के, मुख्याध्यापक नरेंद्र कोल्हे, पोस्ट मास्तर दादाराव नासरे, राजाभाऊ वानखेडे हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
गत अनेक वर्षा पासुन नागपंचमी दिनी दही हंडीची अध्यात्मीक परंपरा नेरी (मिर्झापुर) येथे अखंडपणे सुरू आहे. हिच परंपरा जप सरपंच बाळा सोनटक्के यांच्या प्रयत्नाने नेरी (मिर्झापुर) पुनर्वसीत वसाहतीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात ग्राम उत्सव समिती, महिला भजन मंडळ, बाल गोपाल गुरूदेव सेवा मंडळ, महादेव बाऱ्या मंडळ तथा शेकडो गावकऱ्यांनी सहभाग नोंदवीला.
या प्रसंगी सत्कार मुर्ती मनीष ठाकरे यांनी मार्गदर्शन करतांना, सर्पां विषयी माहिती देवुन त्यांचा स्वभाव कसा असतो, त्यांच खाद्य काय आहे. त्यांच्या पासुन मानव जातीला व शेतकऱ्यांना होणारे फायदे आदिची सखोल माहिती दिली.
यावेळी दही हंडी व काल्याचे वितरण करण्यात आले. परिसरातील गाव खेड्याच्या लोकांनी याचा लाभ घेतला. तर, गुरूदेव टोपी, दुपट्टा व श्रीफळ देवुन मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. दर्शन चांभारे यांनी केले, आभार ग्रामपंचायत अधिकारी संजय यावले यांनी मानले. तर, राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.