दारुची वाहतुक करणाऱ्यावर खरांगणा पोलीसांची कारवाई दोघांना अटक ९४ हजाराचा माल जप्त

आर्वी,दि.३१:- मोहा गावठी दारुची दुचाकीने वाहतुक करणाऱ्यांना, पोलीसांनी अडवुन त्यांचेकडुन प्लॅस्टीक थैलीतील मोह्याची गावठी दारु व दुचाकी जप्त केली आणी दोघांनाही अटक केली. खरांगणा पोलीसांनी हेटी- खरांगणा मार्गावर हि कारवाई केली.
हेटी-खरांगणा मार्गाने गावठी दारुची वाहतुक केल्या जात असल्याची गुप्त माहिती खरांगणा पोलीसांना मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पुष्पा वाढई यांच्या शेताजवळ नाकेबंदी केली. या दरम्यान निळ्या रंगाची दुचाकी त्यांना येतांना दिसली. दुचाकी अडवीताच दोघांच्या मधात प्लॅस्टीकची थैली दिसली. तिची पाहणी केली असता तिन प्लॅस्टीक चुमड्यांमध्ये मोहा दारु आढळून आली. चुमड्यांमधील ३० लिटर गावठी मोहा दारु व हिरो कंपनीची स्पलेंडर दुचाकी असा एकुण ९४ हजार रुपयाचा माल जप्त केला.
हि कारवाई पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पो.ह.वा. मनीष श्रीवास, मनीष वैध्य, पो.शी. अमर करणे, पो.शी. शंकर केंद्रे यांनी केली.