तीन महिण्यापुर्वी गायप झालेल्या बालकाचा बळी की, वन्य प्राण्याने घेतला जिव
पोलीसांचा तपास सुरू, पाच संयुक्त पथक छानुन काढत आहे वन क्षेत्र

आर्वी, दि. ११:- मांडला लगतच्या वन क्षेत्रात वास्तव्य करुन राहत असलेल्या मध्यप्रदेश येथील आदिवासी कुंटूंबातील तिन वर्षाचा एक बालक होळीच्या एक दिवस आधी गायब झाला. पोलीसांनी त्याचा कसुन शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांच्या आदेशाने पुन्हा बुधवारी (ता.११) अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे यांच्या नेतृत्वात पोलीस व वनविभागाच्या संयुक्त पथकाच्या सहाय्याने शोध सुरू करण्यात आला आहे. हरवीलेल्या या बालकाचा अंधश्रध्देपोटी बळी गेला की वन्य प्राण्याने त्याचा जिव घेतला हे कळायला काही मार्ग यातुन मिळत काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्तीक चेंगड असे हरवीलेल्या मुलाचे नाव आहे. मध्य प्रदेश येथुन पाच आदिवासी परिवार मांडला येथे शेती करण्याकरीता आले होते. त्यांनी मांडला लगतच्या वनक्षेत्रात झोपड्या बांधुन आपले वास्तव्य सुरू केले. होळीच्या एक दिवस आधी आई वडील शेतात गेल्यावर दुपारचे वेळी कार्तीक स्वच्छाकरीता लगतच्या शेता जवळ गेला मात्र परत आलाच नाही. आई वडीलाने त्याची तक्रार येथील पोलीसात केली तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव व ठाणेदार सतिश डेहणकर यांच्या मार्गादर्शनात पोलीस व वनविभागाच्या पथकाने सामाजीक संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवुन शोध सुरू केला. संपुर्ण वन परिसर पिंजून काढला मात्र थांग पत्ता लागला नाही. अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुध्दा प्रयत्न केले मात्र काहीच उपयोग झाला नसल्याने प्रकरण थंड्या बस्त्यात पडले होते.
रक्त नमुण्याचा अहवाल आला आणी पन्हा तपासाला गती आली
तत्पुर्वी शोध पथकाला नाल्यातील झाडी युक्त भागात एका दगडावर रक्ताचे डाग आढळुन आले होते. ते परिक्षणा करिता पाठवीण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन ते रक्त मानवाचेच असल्याचे निश्पन्न झाले आणी कार्तीचा एक तर अंधश्रध्दे पोटी बळी दिल्या गेला असावा अथवा वन्य प्राण्याने त्याचा जीव घेतला असावा असा संशय निर्माण झाला आणी वर्धा पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी या दृष्टिने तपास करण्याचे आदेश दिले.
पाच पथक २५० पोलीस व समाजसेवक घेत आहे शोध
वर्धा पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक राहुल चव्हाण, ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात पाच पथकातील २५० पोलीस व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सकाळी सात वाजता पासुन वन परिसरात शोध घेत आहे. त्यांना माजी नगर परिषद उपाध्यक्ष दशरथ जाधव, प्रा. रवींद्र दारुंडे, नितीन आष्टीकर, दर्पण टोकसे, मोहम्मद जमील आदि सुध्दा सहकार्य करीत आहे. वृत्त लीहीपर्यंत शोध मोहिमेच्या हाती काहीच लागले नाही.