Maharashtraसार्वजनीक माहिती

नगर परिषदेची धडक मोहीम, २५० किलो प्लॅस्टीक पिशव्या जप्त तर, १५ हजार रुपयाचा दंड आकारला

वापर करणे बंद होई पर्यंत चालणार कारवाई, पकडलेल्या प्लॅस्टीक पिशव्या अर्ध्या किमंतीत येतात बाजारात

आर्वी,दि.६:- केंद्र शासनाच्या प्लॅस्टीक निर्मुलन मोहीमे अतंर्गत मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांच्या नेतृत्वात नगर परिषद कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (ता.पाच) बाजार पेठेत कारवाई करुन २५० किलो वजनाच्या प्लॅस्टीक पिशव्या जप्त केल्या तर १५ हजार रुपये रोख दंड आकरल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

१२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टीक पिशव्या ह्या पर्यावरणा करीता हानी कारक ठरत आहे. तर दुसरीकडे ह्या पिशव्या खालल्यामुळे गायीसह अनेक प्राण्यांना प्राण सुध्दा गमवावे लागले आहे. याचा विचार करुन केंद्र सरकारने प्लॅस्टीक निर्मुलनचा निर्णय घेतला आहे. याच माध्यमातुन येथील नगर परिषदेने पर्यावरन दिनाचे औचित्यसाधुन गुरूवारी (ता.पाच) येथील बाजार पेठेत धडक मोहीम राबवीली. या मोहिमेत १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या २५० किलो वजनाच्या प्लॅस्टीक पिशव्या जप्त केल्या तर, १५ हजार रुपयाचा दंड आकारला.

मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांच्या मार्गदर्शनात  मनीष मानकर, महेंद्र कुरळकर, रणजीत गोयर,  योगी चंडाले, शिवाजी चिमोंटे, महेंद्र गोयर, मिथुन सारसर, तौसीफ शेख, विजय डीके,  धिरज राणे  आदि सहभागी होते.

वापर करणे बंद होई पर्यंत चालणार कारवाई

     मंगल कार्यालये, मटण व चिकन मार्केट, बाजार पेठ तथा शहरातील किराणा दुकाने आदि ठिकाणी ग्राहकांना संतुष्ठ करण्याकरीता व्यापारी १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टीकच्या पिशव्याचा वापर करतात हे पर्यावरणाकरीता घाकत ठरत असल्याने व्यापाऱ्यांनीच नव्हे तर, ग्राहकांनी सुध्दा याचा वापर करु नये असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांनी करुन जर १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करतांना कुणीही आढळुन आल्यास तो दंडास पाप्त ठरेल अशी सुचना दिली, सोबतच हि मोहिम प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर बंद होई पर्यंत सुरू राहील असे सुध्दा त्यांनी सांगीतले आहे.

पकडलेल्या प्लॅस्टीक पिशव्या अर्ध्या किमंतीत येतात बाजारात

      जुने अनुभव पाहता, नगर परिषदेने जप्त केलेल्या हजारो रुपयाच्या प्लॅस्टीक पिशव्या नष्ट न करता पुन्हा अर्ध्या किमंती मध्ये बाजारात विकल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे. मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांनी याकडे विशेष लक्ष देवुन पंचासमक्ष त्या नष्ट करण्याची कारवाई करावी. जेणे करुन भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही आणी प्लॅस्टीक निर्मुलनाची मोहीम पण पारदर्शीपणे यशस्वी होईल.

    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button