जनआक्रोष समितीने घेतली बैठक***व्दिभाजक दिडमिटरचाच करा आणी काम त्वरीत सुरू करा- जनतेची मागणी ***खासदार, आमदार व अधिकाऱ्यांनी एकत्र येवून तिढा सोडवावा******
व्दिभाजक दिड मिटरचाच का पाहीजे ?

आर्वी,दि.२५:- शहराच्या मध्यभागातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील व्दिभाजक अर्ध्या मिटरचाच करण्याचा केंद्रीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा अट्टहास आहे मात्र ठरलेल्या प्लॅन प्रमाणे व्दिभाजक दिड मिटरचाच करण्यात यावा आणी हे काम त्वरीत सुरू करावे अशी मागणी विविध संघटनांची आहे. याचा तिढा सोडवीण्याकरीता खासदार, आमदारांनी एकत्र येवुन बैठक घ्यावी अशी अपेक्षा आहे.
महामार्गाचे काम प्लॅन प्रमाणेच व्हावे या करीता निर्माण करण्यात आलेल्या जन आक्रोष समितीने मंगळवारी (ता.२४) येथील विश्राम गृहात विविधी संघटनांचे मत जानुन घेण्याकरीता बैठक बोलावली होती या बैठकीत ५० चे वर प्रतिनीधी सहभागी झाले होते.
केंद्रीय महामार्ग बांधकाम विभागाने निश्चीत केलेल्या प्लॅन प्रमाणे नगर परिषद कार्यालया पासुन पुढे सुध्दा दिड मिटरचाच व्दिभाजक व्हावायला पाहिजे होता मात्र कंत्राटदाराने व्दिभाजकाकरीता अर्ध्या मिटरचीच जागा सोडून काम सुरू केले होते. याची तक्रारी आमदार दादाराव केचे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी सुध्दा जन भावना व गरज लक्षात घेवुन दिड मिटरचाच व्दिभाजक करण्यात यावे असे आदेश बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तर मंगळवारी (दि.१७) येथील विश्राम गृहात बैठक सुध्दा बोलावीली. या बैठकीत बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता बोरकर, कार्यकारी अभियंता जगताप, अभियंता इनामदार तथा जन आक्रोष समितीची सदस्य तथा नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी रस्त्याची पाहणीकरुन व्दिभाजकाकरीता चार फुटाची जागा सोडण्यात येईल अशी कबुली अधिक्षक अभियंता बोरकर यांनी देवुन सोमवार (ता.२३) पासुन काम सुरू करु असे तोंडी आश्वासन दिले. सोबतच झाडांकरीता सुरू असलेल्या जनहित याचीकेत सहभागी होण्याची सुचना केली. जन आक्रोश समितीने याकरीता वकील सुध्दा मुकरर केलेला आहे. मात्र बांधकाम विभागाने आपला शब्द पाळला नाही आणी काम सुध्दा सुरू केले नसल्याने शहरात असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याने जन आक्रोष समितीने मंगळवारी (ता.२४) येथील विश्राम गृहात बैठक बोलावली.
या बैठकीत व्यापारी संघटना, इंडियन रेडक्रॉस संस्था, रोटरी क्लब, मराठा सेवा संघ, बिएसपी, लायन्स क्लब, पत्रकार संघटना आदिंचे ५५ प्रतिनीधी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. श्यामसुंदर भुतडा, उमेश भुसारी, सर्व्हेश भार्गव, सुरेश कोटवाणी, हाजी सुलेमान आदिंनी आपले विचार मांडले. यात दोन्ही आमदार व खासदार जर तयार आहेत तर काम कुणामुळे थांबले? असा प्रश्न निर्माण करण्यात आला आणी व्दिभाजक प्लॅन प्रमाणे दिड मिटरचाच करण्यात यावा जेणे करुन नागरिकांच्या सोयीचे हाईल् अशी मागणी करण्यात आली. याकरीता दोन्ही आमदार, खासदार, अधिकाऱ्यांनी जन आक्रोश समन्वय समितीला सोबत घेवुन लवकरात लवकर निर्णय घ्यावे असे सर्वानुमत्ते ठरवीण्यात आले.
या मिटींग मध्ये हाजी सुलेमान, सर्वेश भार्गव, रवी मंशानी, उमेश भुसारी, नितीन खुणे, प्रवीण काळे, धनंजय घाटणासे, संदिप सरोदे, राजु डोंगरे, सुनील माळोद, गोपाल छंगाणी, विजय अजमीरे, डॉ. श्यामसुंदर भुतडा, निस्ताने, टेकचंद मोटवाणी, राजेश सोळंकी, अरुण ढोक, अनील लालवाणी, सुरेश कोटवाणी, हर्षल शेंडे, अफसर खॉ, गौरव कुऱ्हेकर, नरेश गेडाम, सुर्यप्रकाश भट्टड, परवेज साबीर, एस. अंभोरे, जन आक्रोश समितीचे गौतम कुंभारे, पंकज गोडबोले, विजय वाघमारे, डॉ. राजपाल भगत, सतीश शिरभाते, उमंग शुक्ला, मिथुन कोरडे, मनिष उभाड, विनय डोळे आदिंनी सुध्दा आपले विचार मांडले.
व्दिभाजक दिड मिटरचाच का पाहीजे ?
आर्वी- तळेगाव (शा.पं.) महामार्ग हा शहराच्या मध्यभागातुन जात असल्याने याचे दोन भाग पडतात. एकीकडे मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे तर दुसऱ्या बाजुला शाळा, विध्यालय, बँका, बस स्थानक आदि आहेत. या ठिकाणी सर्व्हिस रस्ता नाही. भुयारी मार्ग नाही. परिणामी रस्ता ओलांडण्याकरीता नागरिकांना याच चार पदरी मुख्यमार्गाचा उपयोग करावा लागणार आहे. पादचरी असो अथवा वाहन धारक असो सर्वांना यु टर्न, एल टर्न मारतांना अथवा रस्त्याच्या दुसरीकडे जाण्याकरीता रस्त्याच्या मध्यभागात थांबणे आवश्यक असते अशा वेळी दिड मिटर रुंदिच्या व्दिभाजकाचा उपयोग करावा लागणार आहे. जर हा व्दिभाजक दिड फुटाचा केला तर धड उभ राहायला जागा राहणार नाही. वाहन रस्त्यावरच थांबवावे लागेल परिणामी वाहतुकीला अडथळा तर निर्माण होईल शिवाय मोठ्या प्रमाणात अपघात होवुन जिवीत हानी सुध्दा होण्याची शक्यता आहे. जन आक्रोष समन्वय समितीचे सदस्य दशरथ् जाधव यांनी हि माहिती फळ्यावर नकाशा काढुन स्टेप बाय स्टेप समाजवुन सांगीतली आणी जन आक्रोश समितीचा दिड मिटर व्दिभाजकाचा आग्रह का? हे पटवुन दिले.