Maharashtraभ्रष्टाचार

हिंगणघाट तहसील प्रशासनाचा भ्रष्टकारभार हप्ता घेऊन सुध्दा देतात त्रास राजकीय नेत्याचा वरदहस्त असलेल्यांना सुट तर गरीबांना करतात अटकाव  ट्रॅक्टर मालकाने कार्यालयातच अंगावर ओतल डिझल, आत्मदहण करण्याचा केला प्रयत्न

     हिंगणघाट,दि.४:- हप्ते घेवुन सुध्दा रेतीची गाडी पकडून त्रस्त केल्याने संतप्त झालेल्या बेरोजगार ट्रॅक्टर मालकाने चक्क तहसील कार्यालयातच अंगावर डिझल ओतून आत्मदहन प्रयत्न केला आहे. यामुळे हिंगणघाट तहसील प्रशासनाचा भ्रष्ट कारभार पुढे आला असुन रेती माफीयांना अभय देण्याकरीता झटणारे ते मोठे राजकीय नेते कोण? हा संशोधनाचा विषय झाला आहे.

छोटु वानखेडे असे अंगावर डिझल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे. तो गत एक वर्षा पासुन ट्रक्टरच्या माध्यमातुन होणाऱ्या उत्पन्नावर आपल उदरनिर्वाह चालवीतो. कधी कधी रेतीची सुध्दा वाहतुक करतो. याकरीता शासकीय कर्मचाऱ्याला हप्ता सुध्दा देत राहतो. हप्ता खाऊन सुध्दा बईमान कर्मचारी त्याचा ट्रक्टर पकडून तहसील कचेरीत लावतात आणी सोडत सुध्दा नाही.

  मात्र या उलट बड्या राजकीय नेत्यांचे पायचाटु करणाऱ्यांना अभय देतात. त्यांचा १० चक्का वाहन असो, सहा चक्का असो अथवा टेम्पो असो सर्वांना मुक्त रेतीची वाहतुक करण्याची मुभा दिली जाते. एखाद्यावेळी वाहन पकडल तरी थातुर मातुर कारवाई करुन त्याचे वाहन अवघ्या एक दोन तासात सोडून मोकळे होता. तहसील प्रशासनातील या भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळुन शेवटी छोटु वानखेडे यांनी बुधवारी (ता.चार) तहसील कार्यालय गाठल आणी कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून आत्मदहण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थीत कर्मचाऱ्याने त्याच्या हातातील काडी पेटी व डीझेलची डबकी   जबरीने हिसकली परिणामी अप्रीय घटना टळली.

गरीबाला एक व मोठ्यांना दुसरा न्याय, कस काय?

     मी ट्रॅक्टच्या भरवश्यावर माझ घर चालवीतो. कधी कधी रेतीची सुध्दा वाहतुक करतो मात्र या पोटी कर्मचाऱ्यांना हप्ता सुध्दा देतो मात्र माझा ट्रक्टर पकडून तहसील कचेरीत लावल्या जाते आणी सोडत सुध्दा नाही. मात्र बड्या नेत्याचा आशिवार्द असलेल्यांचे ट्रॅक्टर अथवा मोठ्या वाहनाला कोणताच अडथळा होत नाही. वाहन पकडल तरी लवकर सोडून मोकळे होतात. असा आरोप छोटू वानखेडे यांचा आहे.

बडे राजकीय नेते कोण?

     पायचाटु करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अवैध्य धंद्याला पाठींबा देणारे वर्धा जिल्ह्यातील ते बडे राजकीय नेते कोण? याची उकल व्हायलाच पाहिजे. त्यांचे खरे चेहरे पुढे यायलाच पाहिजे आणी हप्ते खाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सुध्दा पोलीस प्रशासने स्वत: पुढाकार घेवुन कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरीकांची आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button