आर्वी-तळेगाव (शा.पं.) महामार्गाचा भ्रष्टकारभार कमी रुंदीचा व्दिभाजक निर्माण करण्याची कंत्राटदाराची तयारी आमदार दादाराव केचे झाले संतप्त, पुर्ण रुंदीचाच व्दिभाजक करण्याचे दिले आदेश
स्वकीयाकडूनच आमदार केचे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, विधान सभेच्या आधिवेशनात प्रश्न विचारनार, अवध्या एका फर्लांगावरच नियम कसा बदलला?, रस्त्याच्या बांधकामात हस्तक्षेप करणारा टकल्या कोण?,

आर्वी,दि.७:- आधीच रखडत, अडखळत सुरु असलेल्या तळेगाव (शा.पं.) आर्वी महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत आहे. त्यातही कारण नस्तांना कंत्राटदाराने दुभाजकाची रुंदी कमी करण्याचा प्रयत्न चालवील्यामुळे आमदार दादाराव केचे संतप्त झाले आणी त्यांनी यावर आक्षेप घेवुन राष्ट्रीय महामार्गाच्या निकशाप्रमाणे पुर्ण रुंदिचा व्दिभाजक करण्यात यावा असे आदेश दिले.
तळेगाव (शा.पं.)-आर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या अवघ्या १४ किलोमिटरच्या बांधकामाला तब्बल आठ वर्ष झाले मात्र रखडत, अडखळत बांधकाम सुरू असल्याने पुर्णत्वास गेले नाही. दरम्यान दोन कंत्राटदार बदलले आणी तिसऱ्याने हात लावला. मात्र तो सुध्दा बांधकाम विभागावर व नागरीकांवर मेहरबानी करीत असल्याचा आव आणत आहे. मनमर्जीप्रमाणे त्याचे काम सुरू आहे. अशातच त्याने दिड मिटरचा व्दिवीभाजक एका फुटावर आणून बांधकाम करण्याचा निर्णय घेतला तशी सुरूवात सुध्दा केली होती. मात्र याची माहिती आमदार दादाराव केचे यांना मिळताच त्यांनी शनिवारी (ता.सात) प्रत्यक्ष भेट देवुन पाहणी केली. राष्ट्रीय महामार्गाच्या निकषा प्रमाणे व्दिभाजकाचे काम पुर्ण रुंदिने करावे असे आदेश दिले असल्याने कंत्राटदारासह अधिकाऱ्यांची सुध्दा भांबेरी उडाली आहे.
स्वकीयाकडूनच आमदार केचे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न
शहराच्या मध्यभागातुन जात असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम योग्य पध्दतीने व नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम होवू नये. भवीष्यात सौंदर्यी करणाला सुध्दा वाव मिळावा हा दृष्टीकोण ठेवुन आमदार दादाराव केचे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातुन १४ किलोमिटर रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळवीली. काम लवकर व्हावे आणी चांगले व्हावे याकरीता त्यांचे प्रयत्न सुध्दा सुरू आहे. म्हणुनच त्यांनी पुर्ण रुंदीचे व्दिभाजक बनवीण्यात यावे अशी भुमीका घेतली. मात्र रस्त्याचे बांधकाम करु नका अशी तंबी दिल्याची अफवा त्यांच्या पक्षातील स्वीकीय पसरवीत असुन त्यांना बंदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.
असा व्हायला पाहिजे व्दिभाजक
अवध्या एका फर्लांगावरच नियम कसा बदलला?
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने बनवीलेल्या नियमावली प्रमाणे चार पदरी रस्त्याच्या मधात दिड मिटरचे व्दिभाजक निर्माण करण्यात यावे असे निकष्क आहे. याच निकषा प्रमाणे बांधकाम विभागाने इस्टीमेट तयार केले. कंत्राटदाराचा करारनामा सुध्दा केला. मॉडेल हायस्कुल कडून नियमा प्रमाणे बांधकाम करण्यात आले. दिड मिटरचा व्दिवीभाजक सुध्दा तयार केल्या गेला मात्र मध्य वस्तीत वर्दळीच्या भागात भरपुर जागा असतांना सुध्दा व्दिवीभाजकाची रुंदी अर्ध्या फुटवरच का आणली? कुणाच्या आदेशाने आणली? बड्या नेत्याचा तर दबाव नाहीना? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून निर्माण केल्या जात असुन व्दिभाजक पुर्ण रुंदिनेच करण्यात यावे अशी मागणी आहे.
कमी रुंदिचा व्दिवीभजक तयार करण्याचा प्रयत्न
विधान सभेच्या आधिवेशनात प्रश्न विचारनार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वेळोवेळी निवेदन देवुन व भेटी घेवुन तळेगाव (शा.पं.)-आर्वी महामार्गाचे बांधकाम मंजुर करुन घेतले. रस्त्याचे बांधकाम चांगले व्हावे हा माझा पर्यत्न आहे. मंजुरी प्रमाणे शहराच्या मध्यभागामधुन जाणाऱ्या रस्त्याच्या मध्ये एक मिटरचा व्दिवीभाजक असायला पाहिजे. मात्र कोणतेही कारण नसतांना अवघ्या अर्धा फुट रुंदीचा व्दिभाजक कंत्राटदार तयार करण्याच्या प्रयत्नात होता. तर, दुसरीकडे निकृष्ट दर्जाचे बांधकाम तो करीत आहे. यामुळे रस्ता तर लवकच फुटणार शिवाय व्दिवीभाजका मध्ये फुल झाडे सुध्दा लावता येणार नाही व विधृत विजेरी सुध्दा उभी करता येणार नाही. या अनियमीतेबाबत येत्या अधिवेशना मी प्रश्न विचारणार आहे असे आमदार दादाराव केचे यांनी सांगीतले.
रस्त्याच्या बांधकामात हस्तक्षेप करणारा टकल्या कोण?
शहराच्या मध्यभागातुन जात असलेल्या रस्त्याच्याच नव्हे तर, विघृत वाहीणीच्या बांधकामात सुध्दा हा टकल्या मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करीत असल्याची जोरदार चर्चाच नाही तर आरोप सुध्दा आहे. शनिवारी (ता.सात) भल्यासकाळी या टकल्याने व्दिवीभाजकाची लांबी एक फुटाचीच ठेवा अशा सुचना केल्याचे सांगीतल्या जाते त्याच म्हणन एैकुणच कंत्राटदाराने कामाची सुरूवात केल्याच बोलल्या जात असुन रस्त्याच्या बांधकामात हस्तक्षेप करणारा हा टकल्या कोण? असा प्रश्न नागरिकांचा आहे तर, बड्या नेत्यांनी सुध्दा याला लाडावुन ठेवू नये अशी सुचना वजा चर्चा आहे.