आमदार दादाराव केचे यांचा दणका, बांधकाम विभागाचे अधीकारी पोहचले रस्त्यावर, व्दिभाजक होणार दिड मिटरचाच
***आमदारांच्या सुचने प्रमाणेच व्दिभाजकाचा निर्णय *** झाडे तोडण्याची परवानगी घेण्याकरीता प्रयत्न करणार, *** झोपडीपुढेच झाडाचा प्रश्न?, टकल्या नारदाचे दुष्कृत्य ***

आर्वी,दि.८:- स्वत:च्या लाभाकरीता आमदाराचा हवाला देवुन व्दिभाजाकाची रुंदी दोन फुट कमी करण्याचा भाजपासोबत सलगी साधुन असलेल्या समाजकंटकाचा इदारा आमदार दादाराव केचे यांच्या दणकयाने रसातळाला पोहचला. केंद्रीय बांधकाम विभागाचे बडे अधिकारी रवीवारी (ता.आठ) येथे पोहचले आणी त्यांनी महामार्गावरील व्दिभाजक दिड मिटरचेच राहील असे कंत्राटदाराला ठणकावुन सांगीतल्याने नागरिकांनी सुटकेचा स्वास सोडला.
केंद्रीय महामार्ग बांधकाम विभागाने रस्त्याच्या बांधकामा करीता प्रोजेक्ट तयार केलेले आहे. त्याच प्रोजेक्ट प्रमाणे बांधकाम व्हायला पाहिजे असा नियम आहे. आवश्यक असतांना परिस्थीती पाहुन यात बदल करण्याची सुट सुध्दा आहे. याच नियमा प्रमाणे आर्वी शहराच्या मध्यभागातुन जाणाऱ्या चार किलो मिटर रस्त्यावर एक मिटरचे व्दिभाजक निर्माण करण्याची तरतुद आहे. कंत्राट देतांना बांधकाम विभागाने तसा करारनाम सुध्दा करुन घेतला. मॉडेल हायस्कुल कडून करण्यात आलेल्या बांधकामात याचे पुर्णपणे पालन केल्या गेले. मात्र पुढे भाजप पदाधिकाऱ्याच्या झोपडी पुढील व्दिभाजकाची रुंद दोन फुटाने कमी करुन अचानक एका फुटावर आणली आणी खळबळ माजली. कंत्राटदाराने बांधकाम सुरू करण्याकरीता आखणी सुध्दा केली मात्र याची माहिती नागरिकांच्या माध्यमातुन आमदार दादाराव केचे यांच्या पर्यंत पोहचली. त्यांनी कामाची पाहणी करुन कंत्राटदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. स्वत: हातात सबल घेवुन कामा करीता लावलेले लोखंडी गडर उखडून काढले आणी व्दिभाजक दिड मिटरचाच करण्यात यावा अशी ठाम भुमीका घेतली. यामुळे कंत्राटदारासोबतच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली. केंद्रीय महामार्ग बांधकाम विभाग नागपुरचे कार्यकारी अभियंता जगताप व कनिष्ठ अभियंता नाबील खान रवीवारी (ता.आठ) येथे पोहचले आणी त्यांनी कामाची पाहणीकरुन आमदार दादाराव केचे यांच्या सोबत संवाद साधला.
आमदारांच्या सुचने प्रमाणेच व्दिभाजकाचा निर्णय
या मार्गावर असलेल्या ३८ झाडांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यत असल्याने व्दिभाजकाची रुंदि कमी करण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती केंद्रीय महामार्ग बांधकाम विभाग नागपुरचे कार्यकारी अभियंता जगताप यांनी देवुन आमदार दादाराव केचे यांच्या सुचने प्रमाणेच व्दिभाजकाच्या बांधकामाचा निर्णय घेण्यात येईल असे सांगीतले.
झाडे तोडण्याची परवानगी घेण्याकरीता प्रयत्न करणार
झाडांचा बहाणाकरुन आपली चुक लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘ व्दिभाजक दिड मिटरचाच करण्यात यावा असे आमदार दादाराव केचे यांनी ठणकावुन सांगीतले तसेच अडथळा निर्माण करणारी झाडे तोडण्याची न्यायालयाच्या माध्यमातुन परवानगी घेण्याकरीता प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.
झोपडीपुढेच झाडाचा प्रश्न?, टकल्या नारदाचे दुष्कृत्य
तळेगाव (शा.पं.)- आर्वी महामार्गचे बांधकाम शेवटल्या टप्प्या पर्यंत पोहचले. या दरम्यान अनेक झाडे रस्त्याला अडथळा निर्माण करीत उभी आहेत. मॉडेल हायस्कुल कडुन शिवाजी पुतळ्यापर्यंचा रस्ता झाला या दरम्यान सुध्दा वाहतुकीला अडथळा निर्माण करत झाडे उभी असतांना व्दिभाजकाची रुंदी कमी करण्याची बुध्दी अभियंत्यांना सुचली नाही. मात्र झोपडी पुढे काम सुरू होताच झाडांच्या अडथळ्याचा प्रश्न? कसा काय निर्माण झाला. आणी व्दिभाजकाची रुंदि कमी करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला. हा कळीचा प्रश्न? नागरिकांच्या मनात निर्माण झाला असुन यातील टकल्या नारदाचे तर दुष्कृत्य नाही ना? असे हि बोलल्या जात आहे.