Maharashtraराजकीय

शिवसेनेचे (शिंदे गट) वर्धा लोकसभा संपर्क प्रमुख राज दिक्षीत यांचा झंजावात सुरू, ठाकरे गटातील तिघांचा प्रवेश, पदाधिकाऱ्यांची झाली बैठक, पालक मंत्री सोबत चर्चा

पालक मंत्री पंकज भोयर यांच्या सोबत केली चर्चा, ठाकारे गटाला दुसरा झटका, दोघांचा प्रवेश

आर्वी,दि.१:- वर्धा लोकसभा संपर्क प्रमुख पदाची धुरा सांभाळताच राज दिक्षीत यांचा झंजावात सुरू झाला असुन ठाकरे गटातील तिघांनी पक्ष प्रवेश केला आहे तर, वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेवुन पालक मंत्री पंकज भोयर यांची भेट घेवुन त्यांच्या सोबत सखोल चर्चा केल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मार्गदर्शनात वर्धा लोकसभेचे संपर्क प्रमुख राज दिक्षीत यांनी वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची रवीवारी (ता.२६) बैठक घेतली. यात संघटनात्मक बांधणीची संपुर्ण माहिती घेवुन गटातटाला बाजुला ठेवुन सर्वांनी एकदिलाने पक्ष संघटना वाढवीण्याकरीता प्रयत्न करण्याच्या सुचना दिल्या.

याशिवाय रवीकांत बालपांडे, प्रशांत शहागडकर, जिल्हा प्रमुख गणेश इखार, राजेश सराफ आदिंनी सुध्दा मार्गदर्शन करुन संघटन वाढीकरीता सातत्याने प्रयतन करीत राहु अशी हमी दिली.

या बैठकीत दशरथ जाधव, चंद्रशेखर नेहारे, संदिप इंगळे, मुर्गेश पिल्ले, नितीन देशमुख, शैलेश रावेकर, वैभव उमप, मंगेश भोगांडे, रोशन राऊत, तुषार, धर्मुळे, रवी घोटे, राहुल चहांद, निखिल सातपुते, प्रशात लहामगे, सुरज मोकडे, तेजस तिखाडे, गौरव धानकुटे, वैभव झाडे, सुशिल शिरे, आशिष मोहोड, गौरव गोमासे, मंगेश रावेकर, शार्दुल वादिले, महेश मुडे, सुर्या हिरेकन, विवेक झाडे, निलेश तिडके, सचिन मांडवकर, आकाश राऊत, चेतन ठाकरे, बादल श्रीवास, सुनील तिमांडे, सुनिता पाटसे, साजिया इनामदार तथा शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालक मंत्री पंकज भोयर यांच्या सोबत केली चर्चा

     शिवसेना पदाधिकारी व शिवसैनीकांची बैठक संपताच वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री पंकज भोयर यांची वर्धा लोकसभा संपर्क प्रमुख राज दिक्षीत यांनी भेट घेवुन त्यांच्या सोबत विविध प्रश्नांवर सखोल चर्चा केली. यावेळी वर्धा जिल्हा प्रमुख गणेश इखार व राजेश सराफ यांच्यासह, रवीकांत बालपांडे, बाळाभाऊ शहागडकर, दशरथ जाधव, मुर्गेश पिल्ले, चंद्रशेखर नेहारे आदी उपस्थीत होते.

ठाकारे गटाला दुसरा झटका, दोघांचा प्रवेश

      राज दिक्षीत यांनी वर्धा‍ जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळताच अवघ्या एका महिण्याच ठाकरे गटाला मोठे झटके दिले. पहिला झटका मंगवारी (ता.२२) दिला. यावेळी ठाकरे गटातील माजी वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख, माजी उपजिल्हा प्रमुख, विविध तालुक्याचे तालुका प्रमुख आदि अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेताल तर, सोमवारी (ता.२८) कारंजा (घाडगे) येथील नितीन सरोदे व मेश्राम पाटील यांनी संदिप टिपले यांच्या नेतृत्वात प्रवेश घेतला आणी दुसरा झटका दिला. यामुळे वर्धा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या भुवया उंचावल्या असुन आणखी मोठ्याप्रमाणात पक्ष प्रवेश होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button